कामगार विरोधी धोरणाचा निषेध; डिचोलीत सेझा कामगारांची निदर्शने

कामगार विरोधी धोरणाचा निषेध करीत आयटकशी संलग्न असलेल्या डिचोलीतील सेझा कामगारांनी आज डिचोलीत (Dicholim) निदर्शने केली.
SEZA Workers
SEZA WorkersDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: कामगार विरोधी धोरणाचा निषेध करीत आयटकशी संलग्न असलेल्या डिचोलीतील सेझा कामगारांनी आज डिचोलीत (Dicholim) निदर्शने केली. सेझा मायनिंग वर्कर्स युनियनच्या बॅनरखाली या कामगारांनी डिचोलीत सेझा खाण कंपनीच्या फाटकासमोर ही निदर्शने केली. कामगारांची पिळवणूक थांबवा. या मागणीबरोबरच तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना या कामगारांनी पाठींबा दिला.

SEZA Workers
पेडणे मतदार संघात 'सरकार तुमच्या दारी' हा सरकारचा नवीन उपक्रम

कृषी कायदे रद्द करण्याची मागणीही कामगारांनी केली. शेतकरी आणि कामगार वर्गावरील अत्याचार आणि सतावणुकीच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी आज (ता. 27) देशव्यापी 'भारत बंद' ची हाक दिली होती. या आंदोलनाला आयटकने पाठींबा जाहीर केला होता. त्याचाच भाग म्हणून आयटकशी संलग्न असलेल्या सेझा मायनिंग वर्कर्स युनियनने सिद्धेश परब, आत्माराम तिळवे आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली डिचोलीत निदर्शने केली. दरम्यान, येत्या गुरुवारी (ता.30) पणजीत आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या धरणे कार्यक्रमात हे कामगार सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Monsoon Safety Goa
Goa Crime Branch Investigation
Oil Spill Road Accident Goa
 Goa land ,Environment Protection
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com