अमेरिकेतून 'देसी गर्ल' 7 वर्षानंतर गोव्यात, मालक स्वतः हातात प्लेट घेऊन आला स्वागताला; Video Viral

Priyanka Chopra Goa Visit: बॉलिवूडची आणि हॉलिवूडची स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात परतली असून, ती गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे.
Priyanka Chopra
Priyanka ChopraDainik Gomantak
Published on
Updated on

Priyanka Chopra Goa Viral Video: बॉलिवूडची आणि हॉलिवूडची स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात परतली असून, ती गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. गोव्यात आल्यावर तिने तिच्या एका आवडत्या रेस्टॉरंटला भेट दिली, जिथे तिने सात वर्षांपूर्वी पती निक जोनाससोबत शेवटची भेट दिली होती. यावेळी तिने अनेक चविष्ट पदार्थांची चव घेतली. सध्या प्रियांकाचे गोव्यातील हे फोटोज बरेच व्हायरल होत असून तिचे चाहते ती परत भारतात आल्याने खुश आहेत.

'Pousada By The Beach' मध्ये विशेष पाहुणचार

प्रियांका चोप्राने गोव्यातील तिच्या आवडत्या भोजनालयांपैकी एक असलेल्या 'Pousada By The Beach' या रेस्टॉरंटला भेट दिली. तिने २०१८ मध्ये निक जोनाससोबत या ठिकाणी शेवटची भेट दिली होती.

प्रियांकाला रेस्टॉरंटमध्ये पाहून मालक नेविल प्रोएंका यांनी स्वतः तिचे स्वागत केले आणि तिला पारंपारिक गोमंतकीय मिठाया सर्व्ह केल्या. त्यांनी स्वतः गोमंतकीय पदार्थांची खास प्लेट घेऊन येऊन, प्रत्येक पदार्थाबद्दल प्रियांकाला माहिती दिली.

प्लेटमध्ये सेरादुरा (सॉ-डस्ट पुडिंग), बेबिंका (लेयर्ड केक) आणि अल्ले बेल्ले (गोड पॅनकेक) यांसारखे खास गोवन स्वीट स्पेशालिटीज होते.तसेच, त्यावर पावडर शुगर लावलेला एक चॉकलेटचा तुकडाही प्रियांकाला खास स्वागत म्हणून देण्यात आला. या खास पाहुणचारानंतर प्रियांका म्हणाली, "मी परत येऊन खूप आनंदी आहे."

गोव्याच्या स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी

'Pousada By The Beach' हे गोव्यातील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंट्सपैकी एक आहे. येथील शांत आणि आरामदायी वातावरणामुळे सूर्यास्ताचा आनंद घेत चविष्ट पदार्थांची चव घेणे शक्य होते.

Priyanka Chopra
Priyanka Chopra: गोव्यापासून अमेरिकेपर्यंत प्रियांकाचं साम्राज्य!

इथे गोमंतकीय मिठायांव्यतिरिक्त, येथील इतर खास 'मस्ट-ट्राय' डिशेस, कोकणी मसाल्यांमध्ये शिजवलेला लॉबस्टर, टायगर प्रॉन्स, किंग प्रॉन्स, फिश आणि कालमारी असलेली सीफूड प्लॅटर, फ्राईड चिकन, गोवन पोर्क चॉरिझो आणि व्हेजिटेबल कॅफ्रील.

हे सर्व पदार्थ गोव्याच्या अस्सल चवीची अनुभूती देतात. रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये अल्कोहोलयुक्त आणि अल्कोहोलरहित अशा अनेक रिफ्रेशिंग ड्रिंक्सचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com