Priyanka Chopra: गोव्यापासून अमेरिकेपर्यंत प्रियांकाचं साम्राज्य!

Manish Jadhav

देसी गर्ल 'प्रियांका चोप्रा'

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून ठसा उमटवणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा आज 42 वर्षांची झाली.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

प्रियांकाचा वाढदिवस

प्रियांका आपला आज 42 वा वाढदिवस दिवस साजरा करतेय. प्रियांका सध्या पती निक जोनासबरोबर अमेरिकेत राहते.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

कोट्यवधींची संपत्ती

प्रियांका खूप आलिशान जीवन जगते. तिच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

सर्वाधिक मानधन!

बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका चित्रपटासाठी सुमारे 12 कोटी रुपये मानधन घेते. तर हॉलिवूड वेब सीरिजच्या एका एपिसोडसाठी सुमारे 2 कोटी रुपये घेते.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

कमाई

प्रियांका सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मोठी कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 3 कोटी तर तर एका जाहिरातीसाठी जवळपास 5 कोटी रुपये घेते.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

बिझनेसवूमन

अभिनेत्री असण्यासोबतच प्रियांका एक यशस्वी बिझनेसवूमन देखील आहे. तिचा अनोमली नावाचा हेअर केअर ब्रँड आहे. याशिवाय, प्रियांकाचा परफेक्ट मोमेंट क्लोदिंग ब्रँडही आहे.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंट

प्रियांकाचे न्यूयॉर्कमध्ये आलिशान रेस्टॉरंट आहे. तिच्या या रेस्टॉरंटचे नाव 'सोना रेस्टॉरंट' असे आहे.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

पर्पल पेबल पिक्चर्स प्रोडक्शन

प्रियांका चोप्राचे पर्पल पेबल पिक्चर्स नावाचे प्रोडक्शन हाऊसही आहे. देसी गर्लने डेटिंग ॲप बम्बलमध्येही पैसे गुंतवले आहेत.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

प्रॉपर्टी

प्रियांकाची मुंबईत दोन घरे आहेत ज्यांची किंमत प्रत्येकी 8 कोटी रुपये आहे. याशिवाय, तिची गोव्यातील बागा बीचजवळ एक प्रॉपर्टी आहे, ज्याची किंमत सुमारे 20 कोटी रुपये आहे.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

प्रायव्हेट जेट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांकाची एकूण संपत्ती 620 कोटी रुपये आहे. प्रियांका दर महिन्याला सुमारे 1.5 कोटी रुपये कमावते. तिच्याकडे एक प्रायव्हेट जेटही आहे.

Priyanka Chopra | Dainik Gomantak

कार कलेक्शन

प्रियांकाकडे अडीच कोटी रुपयांची रोल्स रॉयस कार आहे. ही कार खरेदी करणारी प्रियांका ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे. याशिवाय, मर्सिडीज बेंझ एस क्लास, पोर्श, मर्सिडीज बेंझ ई क्लास, मर्सिडीज-मेबॅक एस 650, ऑडी क्यू7 आणि 1.1 कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू सारख्या अनेक कार आहेत.

Priyanka Chopra | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी