पणजी : झुआरी पुलावर झालेल्या अपघातानंतर रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यांचे खच्चीकरण आणि हॉटमिक्स जाण्याच्या प्रकारांमुळे अपघात होत असल्याचे दावे केले जात आहेत.
झुआरी पुलावर पणजीच्या दिशेने येणाऱ्या बाजूला एक मोठा खड्डा असल्याने येथे ब्रेक लावल्यास गाडी सरकून अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे पुलांवरील रस्ते सुरळीत करण्यास सार्वजनिक बांधकाम खाते प्राधान्य देईल. बहुतांश पुलांवरील रस्ते दुरुस्त करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याने ‘गोमन्तक’ला दिली.
‘अटल सेतू’वर खड्डे पडल्यामुळे मोठा वाद झाला होता. नोव्हेंबरमध्ये पुलावरील रस्त्याचे नव्याने डांबरीकरण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी विधानसभेत दिली होती.
परंतु इतर पुलांवरील रस्ता सुरक्षेबाबत अजूनही प्रश्न प्रलंबित आहे. राज्यातील अनेक पुलांची वजन पेलण्याची क्षमता कोलमडली असून, त्यांचे निरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. कारण, अनेक पूल आता 30 वर्षांपेक्षा अधिक वयाचे म्हणजे जीर्ण झालेले आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. तसेच, या पुलांवरील कठडे सामान्य असल्याने वेगाने वाहन आदळल्यास ते सहजपणे मोडतात, हे झुआरी पुलावर झालेल्या अपघातानंतर स्पष्ट झालेले आहे.
गिरी सर्व्हिस रस्त्याचे काम युद्धपातळीवर
राष्ट्रीय महामार्ग 66 वरील गिरी येथे खचलेला सर्व्हिस रस्ता थोड्याअधिक प्रमाणात दुरूस्त करण्यात आल्यामुळे त्यावरून वाहतूक सुरू झालेली आहे. परंतु, रस्त्याचे दुरुस्ती काम अजूनही पूर्ण झाले नाही. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी युद्धपातळीवर काम करून काही प्रमाणात रस्ता दुरूस्त करण्यात आला आहे, जेणेकरून वाहतूक सुरू करता येईल, अशी माहिती सार्वजनिक खात्याचे रस्ता विभागाचे मुख्य अभियंता दिनेश गुप्ता यांनी दिली.
अपघाग्रस्त वाहन हे अतिवेगात असल्याने ते जुवारी पुलावरून खाली पडले. त्यात पुलाला दोष देता येणार नाही. वाहनचालकांवर लक्ष ठेवण्याचे काम हे पोलिस खात्याचे आहे. राज्यात उभारण्यात आलेल्या नवीन पुलांवर अपघात झाल्यास वाहन कठडा ओलांडून खाली पडू नये यासाठी व्हर्टिकल क्रॅश बॅरिअर (अपघात रोखण्यासाठी अत्याधुनिक कठडा) बांधण्यात आले आहेत.
- दिनेश गुप्ता, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.