गोव्यात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गोवा पोलिस प्रशासन आणि अबकारी खाते या सगळ्या घटनांकडे लक्ष ठेऊन असते. त्यामुळे अमली पदार्थांची तस्करी करणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. कळंगुट पोलिसांनी कारवाई करत एका नायजेरीयन नागरिकाला एमडीएमए बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
(Nigerian citizen arrested for possession of MDMA in goa)
कळंगुट पोलिसांनी लकी एकोमेये (40) नायजेरीयन नागरिकाला अटक केले आहे. त्याच्याकडून 1. 40 लाखाचे एमडीएमए ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील तपासणी पोलिस करत आहेत.
दरम्यान, वास्को रेल्वे स्थानकावर शालिमार एक्स्प्रेसच्या डब्यात लपवून ठेवलेला मोठा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. 14,550 रुपयांची देशी-विदेशी बनावटीची दारू वास्को रेल्वे पोलिसांनी मंगळवारी सकाळी जप्त केली. मात्र हा मद्यसाठा ट्रेनमध्ये कुणी ठेवला याची माहिती अजूनही मिळू शकली नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.