पूजा शर्माची चौकशीला दांडी, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
Assagao House DemolitionDainik Gomantak

Assagao case: पूजा शर्माची चौकशीला दांडी, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Assagao House Demolition case: आसगाव घर मोडतोड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्माच्या अटकेची मागणी जोर धरु लागली आहे.
Published on

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर मोडतोड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्माने एसआयटीच्या चौकशीला दांडी मारली आहे. एवढेच नव्हे तर राज्यात राजकीय तसेच प्रशासकीय खळबळ निर्माण केलेल्या या प्रकरणामुळे धास्तावलेल्या पूजाने जामिनासाठी अर्ज केला आहे.

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांच्या घराची २२ जून रोजी मोडतोड करण्यात आली. याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर आल्यानंतर पूजा शर्माच्या अटकेची मागणी जोर धरु लागली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्यानंतर एसआयटीने पूजा शर्माला समन्स बजावले होते. शर्माला एक जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

पूजाने चौकशीसाठी दांडी मारत पणजी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. समन्स बजावल्यानंतर त्याची तारीख पुढे ढकलण्याची मागणी पूजाने केली होती. एक जुलै रोजी हजर राहू शकत नसल्याने तारीख बदलण्याची मागणी पूजाने केली होती.

पूजा शर्माची चौकशीला दांडी, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
New Criminal Laws: नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत गोव्यात दोन गुन्हे दाखल; पहिली FIR काय?

आसगाव घर मोडतोड प्रकरणात आत्तापर्यंत जेसीबी चालक, महिला बाऊन्सर्स, वाहन धारकांसह इतरांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर विरोधकांनी मुख्य संशयित पूजाच्या अटकेची मागणी केली.

आसगाव येथील घरावरील कारवाईसाठी पोलिसांवर पोलिस महासंचालकांचा दबाव होता असा प्रकारचा अहवाल हणजूण पोलिसांनी राज्याच्या मुख्य सचिवांना सादर केला. यानंतर पोलिस महासंचालकांच्या निलंबनाची मागणी जोर धरु लागलीय. महासंचालक जसपाल सिंग यांच्या जागी राज्याचे पोलिस महानिरीक्षक बिश्नोई यांच्या नावाची चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com