Margao Police: ‘त्‍या’ मुलांच्‍या पालकांच्या शोधासाठी पोलिस कर्नाटकात

Margao Police: या दोन्‍ही मुलांना कर्नाटकातून गोव्‍यात आलेल्‍या नेत्रावती एक्‍सप्रेसमधून एक जोडपे घेऊन आले होते. हे सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात दिसून आले आहे.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Police: मडगाव रेल्वे स्थानकावर आणि पिंपळकट्ट्यावर दोन लहान मुलांना उघड्यावर साेडून पलायन करणाऱ्या त्‍या अज्ञात जोडप्‍याचा शोध घेण्‍यासाठी मडगाव पोलिसांचे एक पथक कर्नाटकला रवाना झाले आहे. दरम्‍यान, ही दोन्‍ही मुले एकमेकांची भाऊ-बहीण आहेत का, हे तपासून पाहण्‍यासाठी त्‍या दोघांची डीएनए चाचणी करण्‍याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

Goa Police
Goa KTC Bus: ‘कदंब’च्या स्थलांतराची लोकांमध्ये जागृती करा

शनिवारी ही दोन मुले मडगावात सापडली होती. त्‍यापैकी तीन वर्षांची एक मुलगी पिंपळकट्टा परिसरात लोकांना सापडली तर दोन वर्षांचा लहान मुलगा मडगाव रेल्‍वे स्‍थानकावर आरपीएफ पोलिसांना सापडला. या दोन्‍ही मुलांना कर्नाटकातून गोव्‍यात आलेल्‍या नेत्रावती एक्‍सप्रेसमधून एक जोडपे घेऊन आले होते. हे सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात दिसून आले आहे.

हे जोडपे कुठल्या स्टेशनवरून रेल्वेत चढले होते, याचा शोध घेण्यासाठी मडगाव पोलिस स्थानकावरून पोलिस पथक कर्नाटकात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती मडगाव पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली. त्‍या मुलांचे फोटो आणि सीसीटीव्‍हीवरील चित्रण याद्वारे कर्नाटकातील विविध रेल्‍वे स्‍थानकांवर हे पथक चौकशी करणार आहे. हे जोडपे दोन दिवसांपूर्वी नेत्रावती एक्सप्रेसने मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com