पंतप्रधान मोदींचे गोव्यासाठी खास गिफ्ट..!

भारत सरकारतर्फे वस्त्रोद्योग मंत्रालयाने दक्षिण गोव्यातील कुणबी हँडलूम क्राफ्ट्स व्हिलेजला (Kunbi Handloom Crafts Village) उभारण्यासाठी आता परवानगी दिली आहे. त्यामुळे हा उपक्रम गोव्यातील कारागीर आणि विणकरांसाठी मोठे वरदान ठरणार आहे.
Prime Minister Modi's special gift for Goa

Prime Minister Modi's special gift for Goa

Dainik Gomantak

Published on
Updated on

New Year Gift To Goa: भारत सरकारतर्फे देशातील जनतेच्या विकासासाठी नेहमी नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असतात. ज्यामध्ये महिला, लहान व्यावसायिक, गृह्उद्योग, कलाकार अशा सर्वांच्याच फायद्याचे आणि एकंदरीत देशाच्या विकासात हातभार लावणारे उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून साकारले जातात. असाच एक अनोखा उपक्रम आता गोव्यातही होणार आहे.

<div class="paragraphs"><p>Prime Minister Modi's special gift for Goa</p></div>
Goa Omicron Update: गोव्यातील पहिला 'ओमिक्रॉन' रुग्ण डिस्चार्ज...

भारत सरकारतर्फे वस्त्रोद्योग मंत्रालयाने दक्षिण गोव्यातील (South Goa) कुणबी हँडलूम क्राफ्ट्स व्हिलेजला (Kunbi Handloom Crafts Village) उभारण्यासाठी आता परवानगी दिली आहे. या प्रकल्पासाठी भारत सरकारतर्फे 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी ट्विटद्वारे कळविले आहे.

<div class="paragraphs"><p>Prime Minister Modi's special gift for Goa</p></div>
गोव्यातील शाळा अन् कॉलेज 15 दिवसांसाठी बंद ठेवावेत; तज्ञांनी केली शिफारस

हा उपक्रम गोव्यातील कारागीर आणि विणकरांसाठी मोठे वरदान ठरणार आहे. कारण या प्रकल्पामधून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मंत्री पीयूष गोयल यांचे गोव्यातील जनतेतर्फे आभार मानले आहे. ते म्हणाले की, 'पंतप्रधानांनी या उपक्रमाला परवानगी दिल्यामुळे गोव्याच्या संस्कृतीचा प्रचार होईल आणि स्थानिक कारागिरांना चालना आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांकडून गोव्यासाठी ही नवीन वर्षाची भेटच आहे असे म्हणायला हरकत नाही.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com