Prime Minister Irrigation Scheme : ‘विकासनिधीतून घेतलेले साहित्य चार महिने पडून’; प्रधानमंत्री सिंचाई योजना

मात्र, कृषी कार्यालयात गेले चार महिने ते साहित्य धूळखात पडून असल्याचा आरोप सरपंच धिल्लन देसाई यांनी केला.
Prime Minister Irrigation Scheme
Prime Minister Irrigation SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण,प्रधानमंत्री सिंचाई योजनेखाली पाणलोट क्षेत्र विकासासाठी गावडोंगरी पंचायतीला मिळालेल्या निधीतून घेतलेले साहित्य चार महिने झाले तरी पंचायतीकडे सुपुर्द करण्यात आलेले नाही.

या निधीतून घेतलेले साहित्य पंचायत क्षेत्रातील अंगणवाड्यांना पुरविण्यात येणार होते. मात्र, कृषी कार्यालयात गेले चार महिने ते साहित्य धूळखात पडून असल्याचा आरोप सरपंच धिल्लन देसाई यांनी केला.

गुरुवारी कृषी धोरणावर चर्चा करण्यासाठी काणकोण मामलेदार संकुलाच्या सभागृहात कृषी खात्याने बैठक बोलावली होती त्या बैठकीत सरपंच देसाई बोलत होते.

या योजनेचा पहिला हप्ता म्हणून १० लाख रुपयांचा निधी मिळाला होता. त्या निधीतून अंगणवाड्यांना देण्यासाठी अकरा स्टीलची कपाटे, अकरा टेबले व दोनशे प्लास्टिक खुर्च्या खरेदी करण्यात आल्या होत्या.

मात्र, अद्याप त्यांचा पुरवठा संबंधित अंगणवाड्यांना करण्यात आला नाही. गोवा हस्तकला महामंडळातर्फे अंगणवाड्यांना ध्वनिक्षेपक, फर्निचर व आवश्यक साहित्याचा पुरवठा होणार होता पहिल्या हप्त्याचा विनियोग झाल्यानंतर निधीचा दुसरा हप्ता मिळणार होता.

या दिरंगाईबद्दल नागरिकांमध्ये चीड असून त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात खास ग्रामसभा बोलावून निर्णय घेण्यात येणार असल्याचे बैठकीत सुनावले.

Prime Minister Irrigation Scheme
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाला नितीन गडकरींचे नाव द्या; मनसे नेते अविनाश जाधव

लवकरच होणार योजनेची कार्यवाही

यासंदर्भात विभागीय कृषी अधिकारी नागेश कोमरपंत यांना विचारले असता, केंद्रीय प्रधानमंत्री जलसिंचन योजनेखाली १२ कोटी मंजूर झाले आहेत.

त्यात केपे मतदारसंघाचाही समावेश आहे. लवकरच या योजनेची कार्यवाही सभापती रमेश तवडकर यांच्या निर्देशानुसार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rehabilitation Scheme
Goa town planning rule changes
Agniveer Pension And Job Scheme Updates
Goa Women Digital Empowerment Scheme
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com