Panaji News : सुपारीवरील बुरशी वेळीच रोखा

एच.आर.सी. प्रभू : गळतीमुळे पिकाच्या उत्पादनावर होतो परिणाम
betel nut
betel nut Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : सुपारीवर येणारी ‘फ्रूट रॉट’ ही बुरशी वेळीच रोखणे महत्त्वाचे आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात सुपारी गळती होते. परिणामी उत्पादन आणि उत्पन्न घटते. याकरिता शेतकऱ्यांनी कीड नियंत्रणावर लक्ष द्यावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे संचालक एच.आर.सी. प्रभू यांनी केले आहे.

प्रभू म्हणाले, राज्यात २,०७२ हेक्टरमध्ये सुपारीचे पीक घेतले जाते. सरासरी प्रतिहेक्टरी १,९९६ किलो उत्पादन मिळते तर राज्यात ४,१३५ टन सुपारीचे उत्पादन निघते. यात प्रामुख्याने स्थानिक प्रजातीची सुपारी असून कुळागरांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन जाते. अलीकडे सुपारीवर येणारी ‘फ्रुट रॉट’ या बुरशीमुळे सुपारी मोठ्या प्रमाणात गळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या सुपारी गळतीसाठी ही बुरशी कारणीभूत असून शेतकऱ्यांनी मोरचुत आणि चुन्याचे बोर्डो मिक्सर वापरणे गरजेचे आहे.

betel nut
Panaji Monsoon Update: पणजी-ताळगावात मुसळधार पाऊस! पुढील 12 तास IMD तर्फे सतर्कतेचा इशारा

शेतकऱ्यांनी बोर्डो मिक्सर बनवताना चुना आणि मोरचुत प्रत्येकी एक-एक किलो घेऊन त्याचे मिश्रण बनवून ते ४० लिटर पाण्यातून झाडावर फवारावे. ही फवारणी २ ते ३ वेळा १५ दिवसांच्या फरकाने करावी. त्याशिवाय गळून खाली पडलेली अपरिपक्व सुपारी खोल जमिनीत गाडून टाकणे महत्त्वाचे आहे.

betel nut
Panaji News : काकुलो मॉलसमोरच्या रस्ता दुर्दशेला जबाबदार कोण?

मूळ मलेशियन झाड

सुपारीच्या झाडाला आपल्याकडे ‘पोफळी’ असे म्हणतात. ही मलेशियातील पैदास असून त्याचा विस्तार ब्रिटीश राजवट आणि त्या काळाच्या अगोदरच्या काळात झाल्याचे मानले जाते. सुपारीचे शास्त्रीय नाव ‘आरेका कटेच्यू’ असे आहे. मलबारी लोक सुपारीला ‘हारेकावा’ असे म्हणतात आणि या हारेकावावरून सुपारीच्या प्रजातीचे नाव ‘आरेका’ असे ठेवले गेले असावे. त्याचप्रमाणे कर्नाटकात सुपारीला अडका, अडकी म्हणतात. संशोधकांच्या मते या कर्नाटकी नावापासून शास्त्रीय नाव तयार झाले असावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com