Panaji News : काकुलो मॉलसमोरच्या रस्ता दुर्दशेला जबाबदार कोण?

रस्त्याची चाळण : ‘मलनिस्सारण’चे कामही रखडले
Panaji News
Panaji News Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji : काकुलो मॉलसमोरील थॉमस गॅरेजपर्यंतच्या रस्त्याची जी अवस्था झाली आहे, त्याला जबाबदार नक्की कोण? असा आता प्रश्‍न पडला आहे. स्मार्ट रस्ता करण्यासाठी रस्त्यावरील डांबराचा थर जेसीबीच्या साह्याने काढला आणि रस्त्याची चाळण झाली. पावसातच रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम करण्याशिवाय संबंधित यंत्रणेला पर्याय राहिला नसल्याचे दिसून आले.

बालभवन ते काकुलो मॉल आणि काकुलो मॉल ते इंटरनॅशनल हॉटेल (मिरामार) असे स्मार्ट रस्ते करण्याचे काम इमेजीन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीसएससीडीएल) हाती घेतले. त्यातील बालभवन ते काकुलो मॉल हा रस्ता झाला, पण काकुलो मॉल ते इंटरनशॅनल रस्ता अर्धवट राहिला.

थॉमस गॅरेज शेजारील सांतिनेज खाडीवरील पुलाचे काम रखडत राहिले, त्यामुळे मलनिस्सारण प्रकल्पापासून ते इंटरनॅशनल हॉटेलपर्यंतचा स्मार्ट रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. परंतु महत्त्वाची शहरात येण्यासाठी असणारा थॉमस गॅरेज ते काकुलो मॉलपर्यंतचा रस्ता उखडून ठेवला तो तसाच राहिला. त्या ठिकाणी मलनिस्सारणाच्या मोठ्या व्यासाच्या वाहिन्या टाकण्याचे काम झाल्याशिवाय रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे अशक्य आहे.

Panaji News
Panaji News : उच्च शिक्षण संचालनालयाचा पुढाकार; 433 प्राध्यापकांना संशोधनात्मक प्रशिक्षण

मर्यादित वेळ आणि जमिनीची स्थिती पाहता हे काम करणे अवघड असल्याचे दिसूनही रस्त्यावरील डांबरीकरणाचा थर काढणे योग्य नव्हते. महत्त्वाची बाब म्हणजे कंत्राटदाराला थॉमस गॅरेजजवळील पूल उभारताना नाकीनऊ आले. आता खराब झालेल्या रस्त्यावरील खड्डे पावसातच भरण्याचे काम करावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्याची जी अवस्था झाली, त्याला जबाबदार कोणाला धरणार, हा प्रश्‍न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com