Revolutionary Goans: पक्षांतर करणाऱ्या आमदारांनी देवांनाच गहाण ठेवले

रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे अध्यक्ष मनोज परब यांनी पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर केला घणाघात
Manoj Parab
Manoj Parabdainik Gomantak

राज्यातील आमदारांनी केलेल्या पक्षांतरावरुन आता राज्यात चांगलीच खडाजंगी सुरु आहे. राजकीय पक्षांनी या नेत्यांवर घणाघात सुरु केला आहे. 'आज पक्षांतर करणाऱ्या आमदारांनी पक्षांतर करत केवळ गोवेकरांना फसवलेलं नाही. तर ज्या देवांची शपथ घेतली आहे. अशा देवांना ही त्यांनी गहाण ठेवले आहे.'असा घणाघात रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे अध्यक्ष मनोज परब यांनी आज केला. ते गोमन्तक कार्यालय पणजी येथे बोलत होते.

(President of Revolutionary Goans Manoj Parab criticized the defecting MLAs)

Manoj Parab
Mandrem Panchayat: मांद्रे ग्रामपंचायत उपसरपंचावर अविश्वास ठराव संमत

पक्षांतर केलेल्यांना आमदार करण्यासाठी अनेक गोवेकरांनी आपला त्याग केला आहे. गोवेकरांच्या प्रत्येक मतदानाचा, त्यागाचा खून केला आहे. असे ही ते म्हणाले. या सर्वांनी गोवेकरांचा सरळ सरळ विश्वासघात केलेला आहे. तसेच हिंदूत्वाचं समर्थन करणाऱ्या भाजपने देवाची शपथ मोडून येणाऱ्यां काँग्रेच्या आमदारांना पक्ष प्रवेश दिलाच कसा? असा खडा सवाल करत दोन्ही ही पक्ष आपल्या पक्षाच्या अजेंड्याला घेऊन गोमंतकियांशी खेळ करत आहेत असे ही ते म्हणाले.

Manoj Parab
'Friendship Moto Cup: आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे दोन रायडर्स होणार सहभागी

परब म्हणाले, गोवेकरांचा आवाज बनण्याची क्षमता केवळ आणि केवळ रिव्हॉल्युशनरी गोवन्समध्ये आहे. कारण गोवा फॉरवर्डचे विजय देसाई यांनी यापूर्वी ही भाजपात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा त्यांना संधी मिळाली की ते उडी मारणार हे निश्चित आहे.

राज्याने आता पाहिले आहे की, काँग्रेस आणि भाजप यांनी साटंलोटं केले आहे. यांचे केंद्रात एकत्रच सर्व ठरते आहे. त्यांचे दिल्लीतूनच सर्व सेटींग्ज चालते. त्यांना गोवेकरांची काहीही पडलेली नाही. अशीच स्थिती राज्यातील इतर पक्षांची झालेली आहे. त्यामूळे आता गोवेकरांचा आवाज आता फक्त आणि फक्त रिव्हॉल्युशनरी गोवन्स बनला आहे. आणि आम्ही आवाज कधीच कमी होऊ देणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com