Nag Panchami Goa: श्रावणातील पहिला सण म्हणजे ‘नागपंचमी’, सोमवारी सर्वत्र नागपंचमी उत्सहात साजरी झाली. नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा, यासाठी प्रतिवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते.
नागपंचमी दिवशीच फोंडा तालुक्यात अजब योगायोग पाहायला मिळाला. फोंड्यात घरात साप आल्याचा सोळा घटना सोमवारी समोर आल्या.
नागपंचमीच्या दिवशी फोंडा तालुक्यात घरात आल्याचे 16 कॉल्स आले अशी माहिती सर्पमित्र चरण देसाई यांनी दिली. यापैकी 13 सापांना पकडून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले तर, तीन ठिकाणचे साप ते पोचण्याच्या आधीच निघून जंगलात गेले. पकडलेल्या पैकी चार कोब्रा विषारी साप होते तर काही साप बिन विषारी होते. असे देसाईंनी सांगितले.
कडक उन्हामुळे मोठ्या प्रमाणात गरमी होते त्यामुळे साप थंडावा शोधत घरात प्रवेश केला असण्याची शक्यता आहे. दत्तगड बेतोडा येथे नाग देवतेची पुजा चालु असताना साप आला त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांची पळापळ झाली होती लगेच आपल्याला कॉल आला तेव्हा आम्ही त्या ठिकाणी धाव घेऊन आलेला विषारी साप (सोरोप) आम्ही पकडून त्याला सुरक्षित जंगलात सोडण्यात आले. असे देसाईंनी सांगितले.
2023 पासुन 'सेव्ह' संस्थाच्या बॅनरखाली हजारों सापाना जीवदान दिले आहे. तसेच अन्य प्राण्यांनाही जीवदान दिले आहे. असे देसाई म्हणाले.
दरम्यान, नागपंचमी दिवशीच तालुक्यातील या अजब योगायोगामुळे लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. घटनेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.