President Droupadi Murmu Goa Visit: देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गोवा दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी दिली. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या सत्रात तवडकरांनी याबाबत माहिती दिली.
गोवा विधानसभेचे 18 दिवसांचे पावसाळी अधिवेशन आज समाप्त झाले. देशाच्या राष्ट्रापती द्रौपदी मुर्मू 23 ऑगस्ट रोजी गोव्यात येणार आहेत अशी माहिती अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभापती तवडकरांनी सभागृहात दिली.
राष्ट्रपती चार वाजता गोव्यात येतील आणि राज्यातील सर्व आमदारांना संबोधित करतील असेही तवडकर म्हणाले. विधानसभेच्या सर्व सदस्यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन तवडकरांनी आमदारांना केले.
गेल्या वर्षी अधिवेशन काळातच राष्ट्रपती मुर्मू गोव्यात आल्या होत्या.
मागील वर्षी गोव्यात पावसाळी अधिवेशन सुरू होते त्याचवेळी राष्ट्रपती पदासाठी नाव निश्चित झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू गोव्यात आल्या होत्या. यावेळी त्याच्यासोबत भाजप नेते विनोद तावडे देखील उपस्थित होते.
अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री आणि भाजप आमदार मुर्मू यांची भेट घेण्यासाठी गेल्यानंतर सभागृहात गोंधाळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, यावेळी अधिवेशन संपल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू गोव्यात येत असून, सर्व आमदारांना त्या संबोधित करतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.