धावत्या ट्रेनमधून मोबाईल सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या झारखंडच्या चोरट्याला कोकण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 14 लाख 30 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेचा (Artificial Intelligence) वापर करून चोरट्याचा शोध घेण्यात आला.
नसीम अलियास सलिम खान (वय 56, रा. बोकरो, झारखंड) असे अटक आरोपीचे नाव आहे. नसीमला मडगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुमिता भट (वय 51, रा. खोर्ली, गोवा) या 07 ऑगस्ट रोजी नेत्रावळी एक्सप्रेममधून प्रवास करत होत्या. दरम्यान, प्रवासात त्यांच्या सीटवरील बॅगची चोरी झाली. बॅगमध्ये त्यांची महत्वाची कागदपत्र, ओळखपत्र आणि चार सोन्याच्या चैन, दोन सोन्याच्या बांगड्या, एक सोन्याचा नेकलेस व इतर दागिने मोबाईल असा एकूण सात लाख 59 हजार किमतीचा मुद्देमाल होता.
याप्रकरणी त्यांनी कोकण रल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी एआयची मदत घेऊन चोरट्याचा शोध सुरू केला.
कोकण पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत योग्य स्टाफची योग्य ठिकाणी नेमणूक करून चोरट्याला ट्रेस केले. चोरट्याचा पत्ता लागताच त्याला अटक करण्यात आली.
अटक केल्यानंतर त्याला कोकण रेल्वे पोलिसाच्या मडगाव स्थानकात आणण्यात आले. त्याच्याकडून 36 मोबाईल, सोन्याचे दागिने असा एकूण 14 लाख 30 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अशी होती मोडस ऑपरेन्डी
चोरटा नसीम कारवार येथे ट्रेनमध्ये मोठ्या शॉपिंग बॅगसह ट्रेनमध्ये चढायचा, त्यानंतर ट्रेनमधील महिलांच्या बॅग टार्गेट करून चोरी करायचा. मडगाव स्थानकावर तो चोरीच्या साहित्यासह उतरत असे आणि पुन्हा मडगाव ते कारवार असा प्रवास करायचा. असे पोलिसांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.