

कारवार: देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चार दिवसांच्या गोवा, कर्नाटक आणि झारखंडच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी मुर्मू यांनी कारवार बंदरातून भारतीय नौसनेच्या पाणबुडीतून सागरी सफर केला.
दिवगंत माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्यानंतर पाणबुडीतून सफर करणाऱ्या त्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. भारतीय नौसेनेच्या वाघशीर पाणबुडीतून मुर्मू यांनी केलेल्या सागरी सफरीचे फोटो, व्हिडिओ समोर आले आहेत.
रविवारी कारवार बंदरावरुन राष्ट्रपती मुर्मू यांनी आयएनएस वाघशीरमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत अडमिरल दिनेश के. त्रिपाठी उपस्थित होते. दोन तासांच्या सागरी सफरीत मुर्मू यांनी पाणबुडीवरील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. संपूर्ण स्वदेशी बनावटीची असणारी वाघशीर पाणबुडी कलवरी वर्गात मोडते.
पाणबुडीतून प्रवास केल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. “वाघशीरमधून प्रवास करणं, अधिकारी, पाणबुडीवरील जवानांशी संवाद साधणं आंनददायी अनुभव होता. यावेळी विविध प्रात्यक्षीक दाखविण्यात आली. या प्रवासात शिस्त, आत्मविश्वास आणि उत्साहाचे अभूतपूर्व दर्शन घडले”, अशी नोट मूर्मू यांनी लिहली आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांच्या सागरी सफरीचे फोटो आणि व्हिडिओ भारतीय नौसेना आणि राष्ट्रपती भवनच्या अधिकृत हँडलवरुन शेअर करण्यात आले आहेत. मूर्मु शनिवारी सायंकाळी गोव्यात दाखल झाल्यानंतर गोव्यातून त्यांनी रविवारी कारवार गाठले. पुढील दोन दिवस त्या झारखंडमध्ये उपस्थित असतील. झारखंडमधील विविध कार्यक्रमात त्या सहभाग नोंदवतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.