President Draupadi Murmu: शिक्षण, संशोधनातील उत्कृष्ट केंद्र होण्याची गोव्यात क्षमता; राष्ट्रपतींनी केले कौतूक

गोवा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उत्साहात; मुली पुढे जात असलेल्या पाहून आनंद वाटतो..
President Draupadi Murmu At Goa University Convocation 2023:
President Draupadi Murmu At Goa University Convocation 2023:Dainik Gomantak

President Draupadi Murmu At Goa University Convocation 2023: शिक्षण आणि संशोधनाचे उत्कृष्ट केंद्र बनण्याची गोव्यामध्ये क्षमता आहे. गोवा या क्षेत्रात अग्रणी होईल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला. गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या.

राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते या कार्यक्रमात पदवी, पदविका अशा विविध विभागातील निवडक 20 विद्यार्थी-विद्यार्थीनींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

President Draupadi Murmu At Goa University Convocation 2023:
Goa HIV Cases: चिंताजनक! गोव्यात 6 महिन्यांत 119 एचआयव्ही रूग्णांची नोंद; सर्वाधिक रूग्ण बार्देश तालुक्यात

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, पदवी घेणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहे, ही चांगली गोष्ट. मुली पुढे जात असलेल्या पाहून आनंद वाटतो. आज मिळवलेली पदवी नोकरी-व्यवसायासाठी लाभदायी ठरेलच पण त्याहीपेक्षा ही पदवी तुम्हाला हिंमत देईल. परिस्थिती कशीही असली तरी तुम्ही त्याला हिंमतीने सामोरे जाऊ शकता.

मुर्मू म्हणाल्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समध्ये पुढे जायला हवे. गोवा विद्यापीठाने आधीच यात काम सुरू केले आहे. पदवी मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. शिक्षण ही निरंतल चालणारी पक्रिया आहे.

संधींचा वापर, आणि आव्हानांचा सामना करण्यात शिक्षण उपयोगी ठरते. नवीन शिक्षण धोरण २०२३ नुसार गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी बदल केले जात आहेत. हे शिक्षण धोरण कौशल्य शिक्षण, रोजगारक्षमता आणि इंडस्ट्री कनेक्ट यांच्याशी जोडली गेले आहे.

President Draupadi Murmu At Goa University Convocation 2023:
President Murmu On Goa Visit: गोव्‍यातील विविधतेतील एकता आदर्शवत; अनमोल निसर्गसंपदा जपण्याचे राष्ट्रपतींचे आवाहन

त्या म्हणाल्या, आंतरशाखीय अभ्यासांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभाग उपक्रम राबवत आहेत. विविध विषयांचा अभ्यास तिथे होत आहे. गोव्याच्या सर्व विभागांचे त्यासाठी कौतूक. शिक्षण आणि संशोधनाचे उत्कृष्ट केंद्र बनण्याची गोव्यात क्षमता आहे. मला विश्वास आहे, गोवा यात अग्रणी होईल.

यावेळी राज्यपाल आणि कुलपती पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचेही भाषण झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com