Goa HIV Cases: चिंताजनक! गोव्यात 6 महिन्यांत 119 एचआयव्ही रूग्णांची नोंद; सर्वाधिक रूग्ण बार्देश तालुक्यात

केपे, काणकोणमध्ये एकही रूग्ण नाही
Goa HIV Cases in 2023:
Goa HIV Cases in 2023: Dainik Gomantak

Goa HIV Cases in 2023: गोव्यात सन 2023 या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत एचआयव्ही संसर्गाची 119 प्रकरणे नोंदली गेली आहेत, असे गोवा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (GSACS) च्या आकडेवारीतून समोर आले आहे.

गोव्यात जानेवारी ते जून 2023 या काळात एचआयव्ही/एड्सच्या एकूण 17 हजार 030 चाचण्या घेण्यात आल्या होत्या. आणि त्याचा एकूण पॉझिटिव्हिटी दर 0.17 टक्के इतका आहे.

जून-अखेरपर्यंत नोंदवलेल्या एकूण HIV पॉझिटिव्ह प्रकरणांपैकी सर्वाधिक 26 प्रकरणे (23.2 टक्के) बार्देश तालुक्यातील आहेत. त्यानंतर मुरगावमध्ये 17 प्रकरणे (15.1 टक्के) आहेत.

Goa HIV Cases in 2023:
Goa Solar Power Project: राज्य सरकारने रद्द केला 110 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प

केपे आणि काणकोण तालुक्यांमध्ये एचआयव्ही संसर्गाची शून्य प्रकरणे नोंदली गेली आहेत. नोंदवलेल्या या प्रकरणांमध्ये 110 प्रकरणांमध्ये (98.2 टक्के) एचआयव्हीची लागण होण्याचे कारण लैंगिक मार्गातून झालेला संसर्ग हे होते.

एचआयव्ही संसर्ग गोव्याच्या सर्व भागांमध्ये पसरलेला आहे. बहुतेक प्रकरणे मुरगाव (18.1 टक्के) आणि सासष्टी (17.3 टक्के) सह बार्देश (21 टक्के ) आणि तिसवाडी (10.3 टक्के) मध्ये नोंदवली गेली आहेत.

GSACS च्या माहितीनुसार 2022 मध्ये गोव्यात एचआयव्हीची 242 प्रकरणे नोंदवली गेली होती. त्यापैकी 16.5 टक्के इतर राज्यांमधील आणि परदेशी होते. 2022 मध्ये आढळलेल्या एकूण एचआयव्ही संसर्गांपैकी 70.6 टक्के हे 15 ते 49 वर्षे वयोगटातील होते.

Goa HIV Cases in 2023:
Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील पेट्रोल-डीझेल दर जैसे थे; दक्षिण गोव्यताील किंमतीत वाढ

2022 मध्ये एकूण एचआयव्ही संक्रमित महिलांपैकी जवळजवळ 21 टक्के 15-34 वर्षे वयोगटातील होत्या तर एकूण संक्रमित पुरुषांपैकी सुमारे 40 टक्के संक्रमित पुरुष या वयोगटातील होते.

35-49 वर्षे वयोगटातील एकूण आढळलेल्या रूग्णांपैकी 34.4 टक्के पुरूष होते तर सुमारे 37 टक्के स्त्रिया होत्या.

GSACS ने म्हटले आहे की, 1999 ते 2022 या कालावधीत प्रसाराचे सुमारे 83 ते 96 टक्के पर्यंत एचआयव्ही प्रसाराचे प्रमुख माध्यम लैंगिक मार्गातून झालेला संसर्ग हेच होते. त्यानंतर 4 ते 8 टक्के संसर्ग पेरिनेटल होता.

रक्त आणि संक्रमित सिरिंज आणि सुया यांद्वारे झालेल्या एचआयव्ही संक्रमणाचे प्रमाण गोव्यात नगण्य आहे, असे GSACS ने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com