संगीत परंपरेचे संवर्धन करा : पर्यटनमंत्री

दु:खी माणसांच्या कानी संगीताचे स्वर कानी पडले, तर मन तृप्त करून जाते म्हणूनच संगीत क्षेत्रात आज झपाट्याने कलाकार घडत आहेत.
तोरसे : गुरुकृपा संगीत संस्थेच्या संगीत संमेलनाचे उद्‍घाटन करताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर. बाजूला पुंडलिक कळंगुटकर, उत्तम वीर, मिलिंद माटे, नाना आसोलकर, सूर्यकांत तोरसकर व अन्‍य मान्‍यवर.
तोरसे : गुरुकृपा संगीत संस्थेच्या संगीत संमेलनाचे उद्‍घाटन करताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर. बाजूला पुंडलिक कळंगुटकर, उत्तम वीर, मिलिंद माटे, नाना आसोलकर, सूर्यकांत तोरसकर व अन्‍य मान्‍यवर.Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: अभिजात संगीत परंपरा (Music Tradition) टिकवून ठेवण्यासाठी देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाकार घडत आहेत, ही समाधानाची बाब आहे. दु:खी माणसांच्या कानी संगीताचे स्वर कानी पडले, तर मन तृप्त करून जाते म्हणूनच संगीत क्षेत्रात आज झपाट्याने कलाकार घडत आहेत. संगीत कला (Music Art) टिकवण्यासाठी काम करतात, सरकारही त्यांना योग्य ते सहकार्य करीत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Azgavkar) यांनी केले.

तोरसे येथे श्री गुरुकृपा संगीत संस्था, कला संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत संमेलनाचे उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कला संस्कृती खात्याचे साहाय्‍यक संचालक मिलिंद माटे, मास्तर पुंडलिक कळंगुटकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरस्कर, विनायक महाले, सरपंच उत्तम वीर, महाबळेश्वर सावंत, नारायण आसोलकर, मनोहर नाईक, प्रभाकर मोटे, प्रार्थना मोटे, ॲड. अमित सावंत यांच्‍याह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

तोरसे : गुरुकृपा संगीत संस्थेच्या संगीत संमेलनाचे उद्‍घाटन करताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर. बाजूला पुंडलिक कळंगुटकर, उत्तम वीर, मिलिंद माटे, नाना आसोलकर, सूर्यकांत तोरसकर व अन्‍य मान्‍यवर.
Goa: पिळगावात रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण

कला संस्कृती खात्याचे सहाय्यक संचालक मिलिंद माटे म्‍हणाले, कला खाते कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्वतोपरी मदत करत असते, कला संस्कृती खाते कुणाचे मानधन रोखून ठेवत नाही, उलट त्या कलाकाराला कशी मदत मिळवून देता येईल त्यासाठी प्रयत्न करत असते.

मास्तर पुंडलिक कळंगुटकर म्‍हणाले, ज्यांना कला सन्मान मिळाला, त्या कलाकाराचे मानधन कला (Art) आणि सांस्कृतिक (Culture) खात्याने रोखून धरल्याचे सांगून यावर लक्ष घालण्याची मागणी केली. कलाकारांनी आता पर्यंत अल्प मोबदला घेवून कलेचा विस्तार आणि प्रसार केला. त्‍यांना जर समाधनकारक मानधन मिळत नसेल, तर त्या कलाकारांनी (Artist) काय करावे, असा सवाल उपस्थित केला. यावेळी मंजुषा मिलिंद माटे हिचे भरतनाट्यम नृत्याचा कार्यक्रम झाला. अर्जुन नाईक यांनी आभार, सूत्रसंचालन ॲड. अमित सावंत यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com