Betul Fort: अरबी तटावरील 17 व्या शतकातील किल्ला, गोवा मुक्तीनंतर झाले दुर्लक्ष; रस्ता गायब, झाडेझुडुपे वाढली

Betul Fort Preservation: रबी समुद्राच्या तटावर असलेला हा किल्ला एक नैसर्गिक आकर्षण स्थळ आहे. परंतु योग्य देखभाल किंवा दुरुस्ती होत हा किल्ला जर्जर होत चालला आहे.
Betul Fort Goa
Betul Fort GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: गोव्यात केवळ समुद्र किनारे, कॅसिनो वा इतर मनोरंजनाचीच साधने नसून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अनेक पुरातन वस्तू व वास्तूही आहेत. परंतु सरकार येथील पुरातन वस्तू व वास्तूंचे जतन तसेच पर्यटनदृष्ट्या प्रसार व प्रचार करण्यास कमी पडत आहे. त्यापैकीच एक म्हणजे बेतूलचा किल्ला होय.

ऐतिहासिक माहितीनुसार हा किल्ला १७ व्या शतकातील असून १७६२ साली पोर्तुगीजांनी कराराद्वारे हा किल्ला तेव्हाच्या राजाकडून स्वत:च्या ताब्यात घेतला. त्यानंतर पोर्तुगीजांनी त्याचा वापर कस्टम हाऊस, पोलिस स्थानक, पोस्ट ऑफिससाठी उपयोग केला.

गोवा मुक्त झाल्यानंतर मात्र या किल्ल्याकडे विशेष लक्ष दिले गेले नाही, त्यामुळे या किल्ल्याची दुरवस्था होत गेली. अरबी समुद्राच्या तटावर असलेला हा किल्ला एक नैसर्गिक आकर्षण स्थळ आहे. परंतु योग्य देखभाल किंवा दुरुस्ती होत हा किल्ला जर्जर होत चालला आहे. सध्या तर या किल्ल्यावर जाणारा रस्ताच दिसेनासा झाला आहे. सर्वत्र झाडेझुडपे वाढलेली आहेत.

Betul Fort Goa
Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

या किल्ल्याचा ताबा कस्टम्कडे असल्याने पुरातत्त्व खाते काही करू शकत नाही, असे इतिहास संशोधक योगेश नागवेकर यांचे मत आहे.

Betul Fort Goa
Ancient Ram Mandir: छत्रपती संभाजीराजांच्या शोधात आला मुघल सम्राट, उद्ध्वस्त केले गोव्यातील राम मंदिर, 1985 साली सापडले अवशेष

सुशोभीकरण आवश्‍यक

बेतूल किल्ल्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्याचे सुशोभीकरण करून पर्यटन स्थळ म्हणून त्याचा विकास केल्यास सरकारला काही प्रमाणात आर्थिक प्राप्ती होऊ शकेल. तसेच स्थानिकांनाही रोजगार मिळू शकतो, असेही नागवेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com