MLA Disqualification: आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी 13 एप्रिलपर्यंत तहकूब

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले याचिकादार गिरीश चोडणकर यांनी ही याचिका सादर केली आहे.
MLA's disqualification
MLA's disqualification Dainik Gomantak
Published on
Updated on

MLA Disqualification: भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या आठ आमदारांविरोधात दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी आज ॲडव्होकेट जनरल यांच्या अनुपस्थितीमुळे पुढील गुरुवारी 13 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली.

या याचिकेवर गेल्या आठवड्यात सुनावणी सुरू झाली होती व ती आज पुढे सुरू होणार होती. सरकारी वकिलांनी आज वेळ मागितल्याने ती पुढे ढकलण्यात आली.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले याचिकादार गिरीश चोडणकर यांनी ही याचिका सादर केली आहे. त्यांचे वकील अभिजीत गोसावी यांनी सांगितले की, या आमदार अपात्रता याचिकेवर सभापतींकडून सुनावणी घेण्यास जाणुनबुजून विलंब लावला जात असल्याने त्यावर लवकर सुनावणी घ्या या मागणीसाठी ही याचिका आहे.

MLA's disqualification
Panaji Smart City: ‘स्‍मार्ट सिटी’वरून बाबूश-उत्पलमध्ये जुंपली

आमदार अपात्रता याचिका तीन महिन्यांमध्ये निकालात काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. मात्र, पाच महिने होत आले तरी या याचिकेतील प्रतिवाद्यांना नोटिसाही बजावण्यात आलेल्या नाहीत.

सभापतींची भूमिका एखाद्या लवादाप्रमाणे असते. त्यामुळे अशा याचिकांवर त्यांनी वेळेत सुनावणी घेणे अगत्याचे आहे. मागील सुनावणीवेळी गोसावी यांनी युक्तिवाद पूर्ण केला होता व सरकारतर्फे बाजू मांडण्यात येत होती. न्यायालयाने ही सुनावणी अर्धवट थांबवून ती आज ठेवली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com