पेडणे (Pernem) तालुक्यातील नागरिकांसाठी शुक्रवार 1 ऑक्टोबर रोजी कोरगाव येथील श्री कमलेश्वर उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या परिसरात आयोजित केलेल्या "सरकार तुमच्या दारी" या उपक्रमाची तयारी पूर्ण झाली असून गुरुवारी सायंकाळी मांद्रे मतदार संघाचे (Mandre Constituency) आमदार तथा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे (Dayanand Sopte) यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांचे स्विय सचिव आत्माराम बर्वे ,पेडणे तालुका मामलेदार अनंत मळीक तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. शुक्रवारी दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy Chief Minister Babu Azgawkar), मांद्रे मतदार संघाचे आमदार तथा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद. सोपटे,जिल्हाधिकारी आय ए एस परिमल राय, आयएएस अजित रॉय आदीसह वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विविध 35 खात्याचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित राहणार आहे त्यांच्यासाठी श्री या ठिकाणी विविध दालने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.त्यात प्रामुख्याने नागरिकांसाठी विविध सरकारी दाखले उपलब्ध करून देण्या बरोबर आरोग्याची तपासणी करण्यासाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत हे डॉक्टर रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत ओषधे पुरविणार आहेत.तसेच तपासणी झाल्यानंतर गरजू रुग्णावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे तसेच अजून पर्यंत ज्यांनी कोविड लस घेतली नाही अश्या साठी या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.त्यात प्रामुख्याने आधार कार्ड किंवा इतर ओळख पत्र नसलेल्यांना सुद्धा लस देण्याची सोय करण्यात आली आहे
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी नागरिका शी संवाद साधणार आहेत त्यात स्वयंपूर्ण मित्र या योजनेचा लाभही नागरिकांना मिळवून देण्यात येणार आहे सकाळी वाजता सुरू होणारां हा कार्यक्रम सायंकाळी 5 पर्यंत चालणार आहे.सकाळी विद्यालयाच्या मैदानावर घातलेल्या मंडपात मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रम होईल त्या नंतर मुख्यमंत्री विविध दालनात जाऊन पाहणी करतील त्यानंतर विद्यालयाच्या सभागृहात स्थानिक लोकप्रतिनिधी,सरपंच,पंच, नागरिक यांच्या समस्या जाणून घेतील त्यांच्याशी संपर्क साधतील त्यासाठी मंडप ,विविध खात्याची दालने,संगणक इंटरनेट आदींची चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे गेले 4 दिवस पेडणे जिल्हाधिकारी श्री निपाणी कर, मामलेदार अनंत मलिक यांच्या सह विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी राबत होते .या ठिकाणी पार्किंग तसेच इतर व्यवस्था चोख ठेवण्यात आल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.