Goa: मये पंचायत क्षेत्रातील हातुर्ली-तिखाजन रस्ता बनला खड्डेमय

मये पंचायत (Mayem Panchayat) क्षेत्रातील हातुर्ली-तिखाजन रस्ता (Haturli-Tikhajan Road) खड्डेमय बनला असून, या रस्त्याची अत्यंत वाताहात झाली आहे.
Haturli-Tikhajan Road
Haturli-Tikhajan RoadDainik Gomantak

मये पंचायत (Mayem Panchayat) क्षेत्रातील हातुर्ली-तिखाजन रस्ता (Haturli-Tikhajan Road) खड्डेमय बनला असून, या रस्त्याची अत्यंत वाताहात झाली आहे. हातुर्ली जंक्शन ते तिखाजन जंक्शनपर्यंतचा साधारण एक किलोमीटर रस्ता ठिकठिकाणी उखडला असून, रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावर लहान-मोठे खड्डे पडल्याने रस्ता वाहतुकीस असुरक्षित बनला आहे. डिचोलीहून चोडणमार्गे पणजीला (Panjim) जाण्यासाठी हा रस्ता शॉर्टकट असल्याने या रस्त्यावरून दरदिवशी विशेष करून दुचाकी आणि चारचाकी मिळून शेकडो वाहनांची ये-जा चालू असते. मात्र हातुर्लीतील रस्त्यावरुन खास करून दुचाकी हाकणे म्हणजे अत्यंत जिकरीचे होते. पावसावेळी तर मोठी समस्या निर्माण होत असते. दुचाकीस्वारांना तर अक्षरशः कसरत करावी लागते.

Goa: न्यायालयाने गांजा प्रकरणी अटक केलेल्या मंतेशचा जामीन नाकारला

खड्डयांचा सामना करताना बऱ्याचदा या रस्त्यावर तोल जावून दुचाकी पडून अपघात घडतात. अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. गेल्यावर्षी या रस्त्याची अशीच दूरवस्था झाली होती. मात्र नंतर खड्डे बुजविण्यात आले होते. आता तर या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. स्थानिक पंचायतीने पुढाकार घेवून या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करावे. अशी मागणी वाहनचालकांसह हातुर्लीतील जनता करीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com