Panjim: पावसाळ्यात 'भिवपाची गरज ना', महापौरांची पणजीवासीयांना हमी; उर्वरीत कामे प्रगतिपथावर

Goa Rain Update: राजधानीतील पावसाळ्यापूर्वी जी कामे करायला हवी होती सुरू आहेत. मंगळवारी राज्यात जो जोरदार पाऊस पडला त्यात पणजीत नुकसान किंवा पावसामुळे इतर कोणत्या समस्या निर्माण झाल्या नाहीत.
Panjim
PanjimDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राजधानीतील पावसाळ्यापूर्वी जी कामे करायला हवी होती सुरू आहेत. मंगळवारी राज्यात जो जोरदार पाऊस पडला त्यात पणजीत नुकसान किंवा पावसामुळे इतर कोणत्या समस्या निर्माण झाल्या नाहीत. परंतु पावसामुळे ज्या त्रुटी समोर आल्या त्या दूर करण्यात येणार आहेत,असे पणजीचे महापौर रोहित मोन्सरात यांनी सांगितले.

मान्सूपूर्व कामाच्या आढाव्याबाबत माध्यमांशी ते बोलत होते. दरम्यान, मोन्सेरात म्हणाले, पणजीतील जी मोठी झाडे आहेत ती काही प्रमाणात पावसात कोसळण्याची शक्यता आहे.

या अनुषंगाने वन खात्याने सर्वेक्षण करून ३५० झाडे धोक्याची ठरवली असून त्यापैकी सुमारे शंभर झाडांची छाटणी करणे अजून बाकी आहे. ती देखील येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहेत त्यासोबतच पणजीतील सुमारे २० इमारती धोकादायक असल्याचे जीईसीने नमूद केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Panjim
Goa Politics: "भविष्य सांगू नका, प्रशासन सांभाळा", काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर सडकून टीका

महापौर तात्काळ फिल्डवर

दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पणजीतील उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी मोठे आंब्याचे झाड कोसळले. या झाडामुळे दुचाकींचे नुकसान झाले. ही घटना कळताच मोन्सेरात यांनी घटनास्थळी जाऊन हे झाड तात्काळ हटविण्यासाठी जेसीबी व इतर आवश्‍यक ती मदत करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

Panjim
Goa Rain: राज्यात पावसाची धुवांधार बॅटिंग; अनेक ठिकाणी झाडे कोसळली अन् विद्युत पुरवठा खंडित

२० इमारती धोकादायक

पावसापूर्वी गटारे उपसली जातात परंतु पुन्हा रस्त्यावरील कचरा, माती, प्लास्टीक आदी गटारांमध्ये शिरून ती तुंबू लागतात. त्यामुळे पहिल्या पावसानंतर पुन्हा गटारे साफ केली जातात. पणजीतील गटारे साफ करण्याचे काम सुरू आहेत. मान्सूनपूर्व जी कामे करायची आहेत ती केली जात आहेत. त्यामुळे पणजीला पावसापासून धोका नसल्याचे मोन्सेरात यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com