Pre-Monsoon Work
Pre-Monsoon WorkDainik Gomantak

Pre-Monsoon Work: हरमलमध्ये निधीअभावी रखडली मॉन्सूनपूर्व कामे; पंचायत निधीही संपला

गलथानपणाबद्दल ग्रामस्थांत संताप
Published on

Pre-Monsoon Work: जूनमध्ये मॉन्सूनचे आगमन होत असल्याने प्रत्येक पंचायत क्षेत्रात मॉन्सूनपूर्व कामे हाती घेतली जातात. मात्र, हरमल पंचायतीने पंचायत निधी संपवून, विकासकामांचा विचका केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. गलथानपणाचा हा कारभार असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

Pre-Monsoon Work
Illegal Construction Case Cancona: ‘त्या’ अवैध बांधकामासंबंधी 7 जून रोजी होणार सुनावणी

दरम्यान, पावसाळ्यात रस्त्यावर पाणी ओहोळासारखे वाहत असते, त्या रस्त्यालगत गटारे बांधावी,अशी सूचना,‘सांबाखा’ च्या अभियंत्यांनी केली होती. खर्च पाच लाखांपेक्षा कमी असल्याने,पाठवलेली फाईल पुन्हा पंचायतीकडे आली. मात्र, सध्या पंचायतीकडे निधी नसल्याने कामे रखडल्याचे समजते.

सध्या या पंचायत क्षेत्रात मॉन्सूनपूर्व कामांची लांबलचक यादी असून प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर वाहनचालक व पादचाऱ्यांना बरीच दमछाक करावी लागते. या रस्त्यावर समतोलपणा नसल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा नीट होत नाही, पाणी रस्त्यात तुंबून राहत असल्याने रस्त्यावर खड्डेमय स्थिती त्यातून पावसाळ्यात वाहनचालक, पादचाऱ्यांना जलस्नान घडते.

कित्येक ठिकाणी गटारे मातीने भरलेली आहेत. मात्र, त्यातून गाळ उपसण्याची गरज आहे. शिवाय धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे वगैरे कामे व्हायची असून पंचायत मंडळ दुर्लक्ष करत आहे.

पंचायत क्षेत्रातील प्रलंबित विकासकामे व मॉन्सूनपूर्व कामांची यादी केली असून,पुढील सोपस्कारासाठी पाठवली आहे. पंचायत मंडळाला मंजुरीची अपेक्षा आहे.

-बेर्नाड फर्नांडिस, सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com