Illegal Construction Case Cancona: ‘त्या’ अवैध बांधकामासंबंधी 7 जून रोजी होणार सुनावणी

पांड्ये यांनी बेकायदेशीरपणे सादोळशे येथे डोंगर सपाटीकरण केले आहे
सुनावणी की पुन्‍हा तारीख!
सुनावणी की पुन्‍हा तारीख!Gomantak Digital Team
Published on
Updated on

Illegal Construction Case Cancona: वापे-सादोळशे येथील बेकायदेशीर बांधकामासंबंधी 7 जून रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात सुनावणी ठेवली आहे.

वापे-सादोळशे येथील स्वामी उर्फ राज शशीभुषण पांड्ये यांनी वनखात्याची कोणतीच परवानगी न घेता डोंगर सपाटीकरण करताना सुमारे तीस वृक्षांची कत्तल करत अवैध बांधकाम केल्याचा आरोप आहे.

पांड्ये यांनी बेकायदेशीरपणे सादोळशे येथे डोंगर सपाटीकरण केले आहे. पैंगीण पंचायतीने त्यांना गेल्यावर्षी नऊ हंगामी कुटिरे उभारण्यास परवानगी दिली होती. मात्र, पांड्ये यांनी कायम स्वरुपी बांधकाम उभारले आहे.

सुनावणी की पुन्‍हा तारीख!
Canacona News : सामाजिक जागृतीसाठी नाट्यकला प्रभावी माध्‍यम : राजू नायक

या संदर्भात पैंगीण पंचायतीच्या गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी आवाज उठविला. त्यावर पंचायतीने काणकोण मामलेदार, उपजिल्हाधिकारी व काणकोण पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याला अनुसरून उपजिल्हाधिकाऱ्यांनी ७ जूनला सुनावणी ठेवली आहे.

सुनावणी की पुन्‍हा तारीख!
Canacona News: काणकोण वृक्षतोडप्रकरणी चौकशी समिती नियुक्त

वन खाते ठोठावणार दंड

वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी या सपाटीकरण केलेल्या डोंगराची पहाणी करून पांड्ये यांनी कत्तल केलेल्या वृक्षासबंधी त्यांना जबाबदार धरून गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांना या गुन्ह्याबद्दल वनखात्यातर्फे दंड ठोठावला जाणार असल्याचे काणकोणचे क्षेत्रीय वनाधिकारी आनंद मेस्त्री यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Morjai Temple Property Misappropriation
Porvorim Gun Firing Case
Goa Police Srinivas Naik Investigation
Srinivas Naik Shooting Case Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com