Mahakumbh: गोव्याच्या मंत्री, आमदारांचा 'बहुचर्चित' महाकुंभ दौरा रद्द; मौनी अमावस्येच्या गर्दीमुळे बदलली तारीख

Goa Ministers Mahakumbh Visit: प्रयागराज येथे होणारी गर्दी लक्षात घेता मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराज येथे येणे टाळावे, असे उत्तर प्रदेश प्रशासनाकडून कळविण्‍यात आले.
Goa Ministers Mahakumbh Visit
Goa Ministers Mahakumbh VisitDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Ministers Mahakumbh Visit Postponed

पणजी: मौनी अमावस्येनिमित्त प्रयागराजच्या महाकुंभात होणारी गर्दी लक्षात घेता गोव्‍यातील मंत्री, आमदारांचा दौरा आजचा नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आला. काल रात्री उशिरा प्रयागराज येथील प्रशासनाकडूनच दौरा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांच्यासह १०० जणांचा समावेश असलेला प्रयागराजचा हवाई दौरा होणार असल्याचे वृत्त आज ‘गोमन्तक’ने दिल्यानंतर त्यासंदर्भात मोठी चर्चा राज्यभरात झाली. अनेकांनी मंत्री, आमदार प्रयागराजला गेले का, याबाबत विचारणा केली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज येथे होणारी गर्दी लक्षात घेता तेथे राजशिष्टाचार आणि सुरक्षिततेचा प्रश्‍‍न निर्माण होणार असल्‍याने मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराज येथे येणे टाळावे, असे उत्तर प्रदेश प्रशासनाकडून कळविण्‍यात आले. आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा दौरा होणार आहे.

Goa Ministers Mahakumbh Visit
Mahakumbh: गोव्याचे मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांसह शंभरजणांचा खास विमानाने 'महाकुंभ'दौरा! कुणाच्या खर्चाने होणार 'पावन'?

भाविकांसाठी दोन रेल्‍वेगाड्या धावणार!

१. गोवा ते प्रयागराज मार्गावर दोन खास रेल्वेगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

२. गोव्‍यातून रेल्वे प्रयागराजला निघाल्यानंतर तेथे भाविकांचे स्वागत तेथील मंत्री, आमदार यांच्‍या उपस्थितीत होईल.

३. मडगावहून सुटणाऱ्या या रेल्वेगाड्या कधी सुटतील, त्यासाठी किती पैसे आकारले जातील, याची माहिती दोन दिवसांत देणार.

४. केवळ प्रवासाचे तिकीट सवलतीच्या दरात देऊन इतर सर्व खर्च राज्य सरकारने करावा असाही विचार प्रशासनात सुरू आहे.

५. प्रत्येक मतदारसंघातून किती जण येऊ शकतील याचा प्राथमिक अंदाज आमदारांकडून घेतला जात असल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com