'पेडण्यातील बेरोजगारी कमी करणार'

भाजपा नेते प्रवीण आर्लेकर यांचं चांदेलमधील प्रचारादरम्यान आश्वासन
Pravin Arlekar
Pravin ArlekarDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी : पेडणे मतदार संघातील बेरोजगाराना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण भाजपा सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आपल्याला विधानसभेत जाण्यासाठी जनतेने आपले पवित्र मत द्यावे. त्या मताचा आदर करून प्रत्येकाच्या घरापर्यंत विकासाबरोबरच सर्वार्थाने प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही भाजपचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी दिली. चांदेल कुंभारवाडा येथे प्रचारादरम्यान स्थानिक पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी पेडण्यातील रोजगाराच्या प्रश्नावर भाष्य केलं. (Pravin Arlekar News Updates)

Pravin Arlekar
Goa Election: ‘आप’मुळे समीकरणे बदलण्याची चिन्हे?

भाजपा (BJP) नेते प्रवीण आर्लेकर यांनी देशाला आणि राज्याला भाजपशिवाय पर्याय नाही, म्हणून आपण भाजपात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारास उदंड प्रतिसाद मिळत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचंही ते पुढे म्हणाले.

Pravin Arlekar
राजेश पाटणेकरांच्या मतपरिवर्तनाचे प्रयत्न असफल

प्रवीण आर्लेकर (Pravin Arlekar) यांनी बोलताना काहीजण स्वत: पेडणे तालुक्यात राहत नाहीत. त्यांचे मतही निवडणुकांपूर्वी या मतदार संघात नव्हते. मात्र आपल्याला उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आपण मतदारसंघात घर बांधले आणि कायम स्वरूपी राहायला आलो. आम्ही मतदारसंघात स्थायिक झालो आहोत. मतदारसंघात कोणकोणत्या समस्या आहेत यांची जाणीव आपल्याला आहे.

Pravin Arlekar
Goa BJP Candidate List: गोव्यात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर

दरम्यान मतदार संघात प्रचाराला (Election Campaign) फिरतो त्यावेळी आपल्याला या भागातील बेरोजगारीची जाणीव होते. ही समस्या आपण विधानसभेत गेल्यावर प्राधान्याने सोडवणार. कधीही स्वत:चा विकास नव्हे, तर जनतेचा विकास करणार असल्याची ग्वाही दिली. आपण कधी खोटी आश्वासने देणार नाही असे आर्लेकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com