भाजपवर टीका करणाऱ्यांपासून सावध राहा

आमदार प्रवीण आर्लेकर यांचा मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित जन संघटनेला इशारा
Pravin Arlekar on Mopa International Airport
Pravin Arlekar on Mopa International AirportDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी : स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी भाजपला टार्गेट करून भाजप सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांपासून सावध राहा, त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या खोट्या माहितीली बळी पडू नका, असा इशारा पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित जन संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिला.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पेडणे तालुक्यातील पाच गावांतील एकूण 90 लाखांपेक्षा जास्त चौरस मीटर जमीन घेतली आहे, परंतु त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अद्याप नुकसानीच नव्हे, तर नोकरीसुद्धा देण्यात आलेली नाही, अशी व्यथा मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित जन संघटनेने आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे मांडली. त्यावेळी ते बोलत होते.

संघटनेचे सरचिटणीस बया वरक यांच्या नेतृत्वाखाली पीडित शेतकऱ्यांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन ज्यांच्या जमिनी मोपा विमानतळ प्रकल्पासाठी घेतल्या, त्यांना कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या देणार याविषयी सविस्तर चर्चा केली. त्यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले, की आतापर्यंत मोपा विमानतळावर पाचशेपेक्षा जास्त नोकऱ्या स्थानिकांना दिलेल्या आहेत. ज्या युवकांना नोकऱ्‍या मिळालेल्या आहेत, तेच आपल्याला कशाप्रकारच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत ते सांगतील. केवळ प्रसिद्धी मिळावी म्हणून विरोधकांनी आणि कुणीही भाजप सरकारवर टीका आणि भाजपला टार्गेट करू नये.

Pravin Arlekar on Mopa International Airport
घाटमार्ग अवजड वाहतुकीला बंद; राज्यातील ट्रकव्यावसायिक संकटात

आमदार प्रवीण आर्लेकर पुढे म्हणाले, की हा विमानतळ भाजप सरकारने आणलेला आहे आणि भाजप सरकारच वेगवेगळ्या माध्यमातून पेडणे तालुक्यातील युवकांना रोजगार देणार आहे. मोपा विमानतळावर अधिकाधिक रोजगार हे पेडणे तालुक्यातील युवकांना मिळणार आहेत. शिवाय आयुष हॉस्पिटलमध्येही रोजगाराच्या संधी आहेत.

बया वरक यांनी यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याशी चर्चा करताना सांगितले, की ‘कंपनीने जो डाटा दिलेला आहे, तो दिशाभूल करणारा आहे. ज्यांनी प्रशिक्षण घेतले आहे, त्यांना कंपनी कायमस्वरूपी नोकरी देण्याची ग्वाही देत नाही.’ यावर आमदार आर्लेकर यांनी अगोदर युवकांनी प्रशिक्षण घ्यावे, जर नोकरी दिली नाही, तर मग काय तो निर्णय घेऊ, असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com