Government Scheme : शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजना पोचवणार - प्रवीण आर्लेकर

प्रवीण आर्लेकर : ८९ लाभार्थ्यांना अटल आसरा योजनेची मंजुरीपत्रे
Praveen Arlekar
Praveen ArlekarDainik Gomantak

मोरजी : भाजप सरकार प्रत्येक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहे. भविष्यात एकही व्यक्ती घराशिवाय असणार नाही, असे प्रतिपादन पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले. पेडणे मतदारसंघातील ८९ लाभार्थ्यांना अटल आसरा योजनेअंतर्गत मंजुरीपत्रे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तथा चांदेल-हसापूरचे सरपंच तुळशीदास गावस, नगरसेविका उषा नागवेकर, विशाखा गडेकर, धारगळचे सरपंच अनिकेत साळगावकर, पोरस्कडेच्या सरपंच निशा हळदणकर, विर्नोडाच्या सरपंच सुजाता ठाकूर, वारखंडच्या गौरी जोशालकर, तोरसेच्या सरपंच प्रार्थना मोटे, पंच स्वाती मालपेकर, वजरीचे सरपंच अनिल शेट्ये उपस्थित होते.

Praveen Arlekar
Government Scheme: अखेर मोदी सरकारने ऐकले! निवडणुकीपूर्वी महिलांसाठी लॉन्च केली खास योजना

यावेळी आर्लेकर म्हणाले की, जनतेची जर साथ मिळाली तर विकास अडत नाही. स्थानिक सरपंच, उपसरपंच यांनीही जनतेपर्यंत योजना पोहोचवण्याचे काम करावे. पेडणे मतदारसंघातील ८९ लाभार्थ्यांना घर दुरुस्तीसाठी मंजुरीपत्रे देण्यात आली. याहीपुढे टप्प्याटप्प्याने अशा योजना मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न असतील.

प्रत्येकाला छोटे का असेना, स्वत:चे घर असावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल आसरा योजना कार्यरत केली आहे. सरकार प्रत्येक योजना नागरिकांपर्यंत पोहोचवताना भेदाभेद करत नाही. प्रत्येकापर्यंत योजना पोहोचवावी, यासाठी भाजप सरकार कार्यरत आहे.

- तुळशीदास गावस, सरपंच, हसापूर.

Praveen Arlekar
Government Scheme: अखेर मोदी सरकारने ऐकले! निवडणुकीपूर्वी महिलांसाठी लॉन्च केली खास योजना

सरकार प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आज पेडणे मतदारसंघातील ८९ लाभार्थ्यांना अटल आसरा योजनेअंतर्गत घर दुरुस्तीसाठी मंजुरीपत्रे दिली आहे. असे आणखी काही लाभार्थी आहेत, त्यांनाही त्याचा लाभ टप्प्याटप्प्याने मिळणार आहे.

- प्रार्थना मोटे, सरपंच, तोरसे.

सरकारने अटल आसरा योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदान अर्थात निधी अगोदर देऊन नंतर ५० टक्के रक्कम देण्याची योजना आखली आहे, त्यात बदल करून पूर्ण रक्कम एकाच वेळी दिली तर पावसाळ्यापूर्वी लाभार्थ्यांना घर दुरुस्ती करता येईल.

- अनिकेत साळगावकर, सरपंच, धारगळ.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com