जून अखेरपर्यंत राज्यात महिला आयुक्त नेमा; अन्यथा मोर्चा

‘आप’च्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांचा इशारा
pratima coutinho
pratima coutinhoDainik Gomantak

पणजी : एप्रिल आणि मे महिन्यात नोंदवलेल्या आठ लैंगिक छळाच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करताना आम आदमी पार्टी महिला शाखेच्या अध्यक्ष ॲड. प्रतिमा कुतिन्हो यांनी भाजप सरकारला गुन्हेगारी न्याय व्यवस्था मजबूत करण्यास आणि महिलांवरील गुन्हे कमी करण्यासाठी ठोस कारवाई करण्यात यावी. जुन अखेरपर्यंत महिला आयुक्त नेमावा अन्यथा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. पक्षाच्या पणजी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

pratima coutinho
फोंड्यात शाळांमधील सुविधांचे वाजले तीन तेरा

महिला आयोग गेल्या तीन महिन्यांपासून प्रमुखाशिवाय कार्यरत आहे. भाजप सरकारने निवडणूक जिंकल्यावर उत्सवांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आणि त्यानंतर खात्यांचे वाटपही करण्यात आले. मात्र, या उत्सवात त्यांना महिला आयुक्त नेमण्याचा विसर पडला, अशी टीका कुतिन्हो यांनी केली.

कुतिन्हो यांनी विश्वजीत राणे यांना महिनाभरात महिला आयुक्तांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आप, महिला विंग, महिला व बाल विभागासमोर आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे. याशिवाय सरकारने शाळांमध्ये लैंगिक शिक्षण तसेच अल्पवयीन मुलांसाठी योग्य समुपदेशन सत्रे लागू करावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.

pratima coutinho
वास्कोमधील जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळला

महिला आणि बालविकास मंत्री विश्वजीत राणे हे महिला आणि अल्पवयीन मुलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत, असे प्रतिपादन आपच्या उपाध्यक्ष सेसिल रॉड्रिग्ज यांनी केले. अनेक पदांवर ते कार्यरत असल्याने महिला व बाल विभाग पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भाजप सरकारने महिला व बालविकास मंत्रिपदी महिला आमदाराची नियुक्ती करून राणे यांचा भार हलका करावा, अशी मागणी रॉड्रिग्ज यांनी यावेळी केली.

‘लैंगिक छळाची मे महिन्यात 5 प्रकरणे’

गेल्या महिन्यात एका आठवड्यात लैंगिक छळाची तीन प्रकरणे नोंदवली गेली. मे महिन्यात आतापर्यंत पाच प्रकरणे नोंदवली गेली. व्हिक्टीम असिस्टंस युनिट अनेक वर्षांपासून हा मुद्दा उपस्थित करूनही, महिला आणि बालविकास मंत्र्यांनी अल्पवयीन किंवा महिलांच्या संरक्षणासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत, असे ॲड. कुतिन्हो म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com