वास्कोमधील जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळला

जीर्ण इमारतींवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.
Building's slab collapses in Vasco
Building's slab collapses in VascoDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को : वास्को मार्केटजवळील जीर्ण इमारतीच्या स्लॅबचा काही भाग शुक्रवारी कोसळला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुरगाव नगरपरिषदेचे (MMC) नगरसेवक विनोद किनळेकर यांनी कमकुवत आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच नगरपरिषदेचे या विषयात लक्ष घालावे, अशी मागणी देखील केली आहे. मागील पंधरवड्यातील स्लॅब कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. (Building's slab collapses in Vasco)

Building's slab collapses in Vasco
गोव्यातील इंधनाचे दर जाणून घ्या

घटनेचे वर्णन करताना आदिल शेख यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ही घटना घडली तेव्हा मोठा आवाज झाला. मी माझ्या रेस्टॉरंटच्या बाहेर येऊन पाहिले तर स्लॅबचा एक भाग फूटपाथवर कोसळला होता. हा वर्दळीचा रस्ता असला तरी कोणीही जखमी झाले नाही. अधिकाऱ्यांनी रहिवाशांच्या सुरक्षेचा विचार करून जीर्ण इमारतींवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक विनोद किनळेकर आणि येथील नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com