Ganesh Idol: चिकणमातीच्या गणेशमूर्ती घ्या, 'पीओपी' नकोच! CM प्रमोद सावंतांचे गोमंतकीयांना आवाहन

Pramod Sawant Ganesh Idol Appeal: पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींऐवजी चिकणमातीच्या गणेशमूर्ती खरेदी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी गोमंतकीय जनतेला केले.
Pramod Sawant Ganesh Idol Appeal
Pramod Sawant Ganesh Idol AppealDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींऐवजी चिकणमातीच्या गणेशमूर्ती खरेदी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी गोमंतकीय जनतेला केले. चिकणमातीच्या मूर्तींना प्राधान्य दिल्यास स्थानिक कुंभार समाजातील कलाकारांना आर्थिक पाठबळ मिळेल, असे त्यांनी सांगितले.

हस्तकला व वस्त्रोद्योग खात्यातर्फे आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. पीओपीच्या मूर्ती पर्यावरणास घातक असून विसर्जनानंतर त्यांची विल्हेवाट लावण्यात अडचणी येतात. त्यामुळे पर्यावरणपूरक चिकणमातीच्या मूर्ती खरेदी करण्यास नागरिकांनी प्राधान्य द्यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Pramod Sawant Ganesh Idol Appeal
Goa ST Reservation: गोव्यात 'एसटी' आरक्षणाची केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी! चार मतदारसंघ राखीव, फळदेसाई-डिकॉस्टा-सिक्वेरा-कवळेकर यांचे राजकीय गणित बदलणार?

राज्यातील पारंपरिक कलाकारांना सरकार विविध माध्यमांतून प्रोत्साहन देत असून, त्यांच्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. २०१४ पासून राज्यातील ५२ केंद्रांद्वारे सुमारे ८ हजार कलाकारांना विविध कलांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील अनेक कलाकारांनी देश-विदेशात आपल्या कलेचे प्रदर्शन केले आहे, असे सावंत यांनी सांगितले.

‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजनेला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सावंत यांनी सांगितले. राज्यातील १८ हजार ५७५ जणांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १२ हजार १७५ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

तसेच ७ हजार ४४२ जणांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे कीट वितरित करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच कीटचे वितरण केले जाईल, अशी हमी त्यांनी दिली.

Pramod Sawant Ganesh Idol Appeal
Goa Drug Trafficking: राज्यात ड्रग्स तस्करीवर जोरदार 'प्रहार', विविध ठिकाणी कारवाई; 12 अटकेत, 10 गुन्हे दाखल, मोठा साठाही जप्त

कुणबी व्हिलेजचे डिसेंबरमध्ये उद्घाटन

साळावली येथील कुणबी व्हिलेजचे उद्घाटन येत्या डिसेंबरपर्यंत करण्यात येईल. त्याचा लाभ राज्यातील पारंपरिक कलाकारांना निश्चितपणे मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com