CM Pramod Sawant: मी मुख्यमंत्री नाही तर मुख्यसेवक; कलावंतांचे सहकार्य लाभले तर गोवा देशाची सांस्कृतिक राजधानी बनेल

मुख्यमंत्र्यांचा विश्वास; कला अकादमीत 2 वर्षानंतर पहिला कार्यक्रम
CM Pramod Sawant:
CM Pramod Sawant:Dainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: मी मुख्यमंत्री नाही तर मुख्यसेवक आहे. सर्वांचे सहकार्य लाभले तर गोवा देशाची सांस्कृतिक राजधानी होऊ शकते, असे उद्घार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

तब्बल दोन वर्षानंतर गोव्याची राजधानी पणजीतील कला अकादमीत पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. स्वर मंगेश हा पहिला कार्यक्रम कार्यक्रम शुक्रवारी संध्याकाळी होता. त्याच्या प्रारंभी ते बोलत होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, माझ्या आधी बोलणाऱ्यांनी राजा उल्लेख केला. मी काही राजा नाही आणि मुख्यमंत्रीही नाही. मी मुख्य सेवक आहे. गोवा राज्याची अंत्योदय तत्वानुसार सेवा करत आलो आहे. काम करत आलो आहे. गोवा ही देशाची सांस्कृतिक राजधानी होऊ शकते.

CM Pramod Sawant:
Goa Government Hotels: स्वस्तात गोवा ट्रिप करायचीय? मग 'या' सरकारी हॉटेल्समध्ये करा बुकिंग

त्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. गोवा पर्यटन राजधानी आहेच. गोव्याला देशाची सांस्कृतिक राजधानी करण्यासाठीही आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. कलाकारांचे सहकार्य लाभले तर गोवा निश्चित्त सांस्कृतिक राजधानी होईल, याची मला खात्री आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, सांस्कृतिक वारसा जपला, पुढे नेला तरच आपण टिकू शकू. भारताने जगाला योग, आयुर्वेद आपली संस्कृती जगाला देण्याची हीच योग्य वेळ आहे. आगामी काळात आपण सांस्कृतिकदृष्ट्या जगावर राज्य करू शकतो.

CM Pramod Sawant:
आता समुद्रातील तरंगत्या ऑफिसमधून करा 'वर्क फ्रॉम गोवा'; 5G नेटवर्कसह विविध सुविधा पुरवणार

ते म्हणाले, पेडण्यापासून काणकोणपर्यंत गोव्याच्या गावागावात भारतीय संस्कृतीचे चांगले साधकच नव्हे तर श्रोतेही तयार व्हायला हवेत. त्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारचे सहकार्य लाभेल.

गोव्याचा हॅपीनेस इंडेक्स उगाच वाढत नाही. अशा कार्यक्रमांतूनच हा हॅपीनेस इंडेक्स वाढतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant MGP Political Limits
Goa Seventh Budget 30000 Crore
Goa CM Pramod Sawant accident help
Goa ST Political Reservation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com