Mantralaya At Porvorim
Mantralaya At PorvorimDainik Gomantak

New Mantralaya At Porvorim: मन्त्रालय: ! पर्वरीतील मिनिस्टर ब्लॉक्सचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन

आज राज्य स्थापना दिनाचा मुहूर्तावर नूतनीकरण केलेल्या संकुलाचे उद्‍घाटन करण्यात आले.

New Mantralaya At Porvorim: पर्वरी येथे राज्य सचिवालयाजवळ नूतनीकरण करण्यात आलेल्या मिनिस्टर ब्लॉक्सचे आज (मंगळवारी) मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.

या मिनिस्टर ब्लॉक्सचे ‘मंत्रालय’ असे नामकरण करण्यात आले आहे. आज राज्य स्थापना दिनाचा मुहूर्तावर नूतनीकरण केलेल्या संकुलाचे उद्‍घाटन करण्यात आले.

Mantralaya At Porvorim
Mantralaya At Porvorim Dainik Gomantak

पर्वरीतील नव्या सुशोभीत केलेल्या इमारतीच्या बाहेर संस्कृत भाषेमध्ये ‘मन्त्रालय’ लिहिले आहे. गोवा राज्य साधन सुविधा महामंडळाकडून या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून याकरिता दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक यासारख्या इतर राज्यांच्या मिनिस्टर ब्लॉक्सना ‘मंत्रालय’ असेही संबोधले जाते.

Mantralaya At Porvorim
Goa Statehood Day: गृहमंत्री शहा, योगी, खट्टर, खांदू, चौहान; गोव्याला घटक राज्याच्या शुभेच्छा देताना कोण काय म्हणाले?
Mantralaya At Porvorim
Mantralaya At Porvorim Dainik Gomantak

गोवा घटकराज्य दिनाचे औचित्य साधून आज सकाळी वैदिक मंत्रोपचाराने उद्घाटन पार पडले. तसेच, उदकशांती आणि वास्तूशांतीद्वारे इमारत प्रकल्पाचे शुद्धीकरण करण्यात आले.

प्रवेशद्वारातच श्री गणेशाचे दर्शन होते तर मुख्यमंत्र्यांच्या दालनात दहा फूट उंच भगवान श्री कृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आसनामागे 'सत्यमेव जयते' हे ब्रिदवाक्य लिहण्यात आले आहे.

Mantralaya At Porvorim
Goa Statehood Day: 36 वा गोवा घटकराज्य दिन; राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांनी गोमन्तकीयांना दिल्या शुभेच्छा

प्रत्येक राज्याच्या राजधानीत मंत्रिमंडळ बसते त्याला मंत्रालय असे म्हटले जाते. पर्वरीत असणाऱ्या मंत्रालयाला सचिवालयाचा जोड भाग म्हटले जायचे.

आज, घटकराज्य दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सावंत यांंनी सुशोभीत केलेल्या मंत्रालय इमारतीचे उद्घाटन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com