Goa Statehood Day
Goa Statehood DayDainik Gomantak

Goa Statehood Day: 36 वा गोवा घटकराज्य दिन; राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांनी गोमन्तकीयांना दिल्या शुभेच्छा

आज गोव्याचा 36 वा घटकराज्य दिन साजरा होत आहे.

Goa Statehood Day: भारतीय सेनेने ऑपरेशन विजय राबवत गोव्याला 450 वर्षांच्या पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त केले.

त्यानंतर आजच्या दिवशी म्हणजेच 30 मे 1987 रोजी गोव्याची स्वतंत्र राज्य म्हणून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी घोषणा केली. गोवा अधिकृतपणे देशाचे 25 वे राज्य झाले.

आज गोव्याचा 36 वा घटकराज्य दिन साजरा होत आहे. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जयदीप धनकड यांनी गोमन्तकीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

"आजच्या दिवशी गोवा अधिकृतपणे भारताचे 25 वे राज्य झाले. सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण राज्याच्या इतिहासात हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. या गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त मी गोव्यातील प्रत्येक नागरिकाला शुभेच्छा देतो.

आपल्या राज्याचा समृद्ध वारसा आणि आशादायक भविष्याची जोपासना करत हा दिवस उत्साहाने साजरा करूया." अशा शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोमन्तकीयांना गोवा घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Goa Statehood Day
Jammu Bus Accident Video: वैष्णोदेवीला जाणारी बस जम्मूमध्ये दरीत कोसळून सात जणांचा मृत्यू, चार गंभीर

गोवा घटकराज्य दिनानिमित्त गोव्यातील जनतेला माझ्या शुभेच्छा! गोवा हे नैसर्ग सौंदर्य, समुद्रकिनारे, प्रेमळ लोक आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीसाठी ओळखले जाते.

राज्याने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. गोवा समृद्ध होत राहो आणि शाश्वत विकासाचे मॉडेल होण्याच्या दिशेने वाटचाल करत राहो. अशा शुभेच्छा देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्या आहेत.

"गोव्याच्या राज्य स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! मनमोहक किनार्‍याचे सौंदर्य, आकर्षक वास्तुकला आणि उद्यमशील लोकांचे आशीर्वाद या शांत राज्याला लाभले आहेत!

आगामी काळातही राज्य विकास आणि प्रगतीचे नवे मापदंड प्रस्थापित करत राहो." अशा शुभेच्छा उपराष्ट्रपती जयदीप धनकड यांनी दिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com