Goa Statehood Day: गृहमंत्री शहा, योगी, खट्टर, खांदू, चौहान; गोव्याला घटक राज्याच्या शुभेच्छा देताना कोण काय म्हणाले?

गोव्याचा 36 वा घटकराज्य दिन आज साजरा होत आहे.
Goa Statehood Day
Goa Statehood DayDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Statehood Day: गोव्याचा 36 वा घटकराज्य दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त देशाच्या राष्ट्रपती, गृहमंत्री यांंच्यापासून विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गोवा आणि गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

"आजच्या दिवशी गोवा अधिकृतपणे भारताचे 25 वे राज्य झाले. सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण राज्याच्या इतिहासात हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. या गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त मी गोव्यातील प्रत्येक नागरिकाला शुभेच्छा देतो." असे मुख्यमंत्री सावंत यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "गोव्याच्या नागरिकांना राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा.

गोव्याने आपली चैतन्यशील आणि वैविध्यपूर्ण संस्कृती जपत प्रगती केली आहे. आगामी काळातही राज्य समृद्ध होत राहो." असे शहा म्हणाले.

"देशाच्या वैभवशाली वारशाची जपणूक करणाऱ्या, देशाच्या समृद्धीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या गोव्याच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील सर्व जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्याने विकासाचे नवनवीन आदर्श प्रस्थापित करावेत, हीच आई शांतादुर्गाच्या चरणी प्रार्थना." अशा शुभेच्छा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.

Goa Statehood Day
Goa Statehood Day: 36 वा गोवा घटकराज्य दिन; राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांनी गोमन्तकीयांना दिल्या शुभेच्छा

"अतुलनीय नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेल्या गोव्याच्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि नागरिकांना शुभेच्छा.

गोवा विकासाची नव नवीन उंची गाठत राहो आणि नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समृद्धी वाढो, हीच सदिच्छा." अशा शुभेच्छा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्या आहेत.

"गोव्याच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा. सुंदर निसर्गसौंदर्य आणि समुद्रकिनारे असलेल्या या राज्याने भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती समृद्ध केली आहे." अशा शुभेच्छा अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांदू यांनी दिल्या आहेत.

Goa Statehood Day
Jammu Bus Accident Video: वैष्णोदेवीला जाणारी बस जम्मूमध्ये दरीत कोसळून सात जणांचा मृत्यू, चार गंभीर

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी गोव्याला शुभेच्छा दिल्या आहेत. "सुंदर समुद्रकिनारे, सांस्कृतिक वारसा आणि गौरवशाली इतिहासासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या गोव्याच्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोव्यातील जनतेला शुभेच्छा." असे त्यांनी म्हटले आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी, "गोव्याच्या राज्य स्थापना दिनानिमित्त तेथील जनतेला शुभेच्छा. या अद्भुत राज्याने नेहमीच समृद्ध होत, नवीन उंची गाठावी." अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

याशिवाय चे भापचे राष्ट्रीय प्रमुख जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि काँग्रेसच्या वतीने गोव्याला घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com