गोवा सरकारचा शपथविधी सर्वसामान्यांसाठी खुला

सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 10 वाजण्यापूर्वी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावं लागणार
 Pramod Sawant Goa CM oath
Pramod Sawant Goa CM oathDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्यात भाजपने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर आता सर्वांना शपथविधीचे वेध लागले आहेत. येत्या सोमवारी 28 मार्च रोजी प्रमोद सावंत गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. हा सोहळा सर्वसामान्यांसाठीही खुला असणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी माहिती दिली आहे.

 Pramod Sawant Goa CM oath
गोवा, उत्तराखंडमधील निर्णयमागे काय होती भाजपची रणनिती

गोव्यात भाजप (BJP) सत्तास्थापनेसाठी सज्ज झाला आहे. ताळगावातील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर गोव्याच्या नव्या सरकारचा भव्य शपथविधी होणार आहे. सकाळी 11 ते 11.30 या वेळेत शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, 7 राज्यांचे मुख्यमंत्री (CM) उपस्थित राहणार आहे.

 Pramod Sawant Goa CM oath
फोंडा तालुक्यात काँग्रेसची दयनीय स्थिती कशामुळे?

ताळगावातील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअमवर शपथविधीची तयारी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पंतप्रधानांसह (Narendra Modi) अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्याने सर्वसामान्यांना या कार्यक्रमाला प्रवेश मिळेल का अशी शंका होती. मात्र आता प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. सर्वसामान्य गोवेकरांसाठी कार्यक्रमस्थळी पास उपलब्ध असतील. तसेच त्यांच्यासाठी वेगळी आसन व्यवस्थाही केली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वसामान्य जनतेला सकाळी 10 वाजण्यापूर्वी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावं लागणार आहे. यानंतर सर्वसामान्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com