UTAA Controversy: 'ST बांधवांवर केलेल्या अन्‍यायाला वाचा फोडण्‍यासाठी गावागावांत जाऊ'! वेळीप यांचा भाजपातून राजीनामा देण्‍यास नकार

Prakash Velip: गोमंतक मराठा समाज, ‘उटा’ या ‘एसटी’ संघटनांवरची बंदी त्‍वरित हटवावी. अन्‍यथा या सरकारने एसटीवर केलेल्‍या अन्‍यायाला वाचा फोडण्‍यासाठी आम्‍ही गावागावांत जाऊ, असा इशारा वेळीपनी दिला.
Prakash Velip UTAA Goa
Prakash Velip UTAA GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: भाजपचा आणि गोव्‍यातील एसटी समाजाचा ‘डीएनए’ एकच आहे असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्‍हणतात, मग या उपेक्षित एसटी बांधवांना अजून राजकीय आरक्षण का मिळाले नाही? असा सवाल ‘उटा’चे अध्‍यक्ष प्रकाश वेळीप यांनी केला.

गोमंतक गौड मराठा समाज आणि ‘उटा’ या दोन्‍ही ‘एसटी’ संघटनांवर जी बंदी घालण्‍यात आली आहे, ती त्‍वरित हटवावी. अन्‍यथा या सरकारने एसटीवर केलेल्‍या अन्‍यायाला वाचा फोडण्‍यासाठी आम्‍ही गावागावांत जाऊ, असा इशारा त्‍यांनी दिला.

दरम्‍यान, भाजपकडून एसटींवर अन्‍याय होत असेल तर तुम्‍ही त्‍या पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर पडणार का? असा सवाल वेळीप यांना विचारला असता, त्‍यांनी नकार दिला. पत्रकार परिषदेत बोलताना वेळीप म्‍हणाले की, गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटविणे आणि त्‍यानंतर लगेच गोमंतक गौड मराठा आणि ‘उटा’ या एसटींच्‍या दोन प्रमुख संघटनांवर बंदी आणणे हा एक सुनियोजित कटकारस्‍थानाचा भाग आहे. हे कारस्‍थान मार्गी लावण्‍यासाठी सरकारी अधिकाऱ्यांचाही पद्धतशीरपणे वापर करण्‍यात आला आहे.

गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून काढल्‍यानंतर तसेच ‘उटा’वर निर्बंध आणल्‍यानंतर या संघटनेने आपली भूमिका स्‍पष्‍ट केली नव्‍हती. मात्र आज ‘उटा’ नेत्‍यांच्‍या उपस्‍थितीत मडगावात पत्रकार परिषद घेऊन वेळीप यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. या कटकारस्‍थानात नेमका कुणाचा हात आहे, असे विचारले असता, ‘ते आम्‍ही सध्‍या शोधत आहोत’ असे उत्तर वेळीप यांनी दिले.

Prakash Velip UTAA Goa
UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

दरम्‍यान, भाजपने एसटींवर अन्‍याय केला आहे तर तुम्‍ही एसटी बांधवांकडे जाऊन भाजपला सत्ताभ्रष्‍ट करा असे सांगणार का? असा प्रश्‍‍न विश्‍‍वास गावडे यांना विचारला असता, आम्‍ही सत्‍य परिस्‍थिती काय आहे ती एसटी समाज बांधवांपुढे मांडू. ते काय निर्णय घेतील तो त्‍यांचा असेल, असे ते म्‍हणाले.

Prakash Velip UTAA Goa
UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

१४ सदस्‍यांचीच ‘उटा’ सोसायटी

‘उटा’ ही आठ संघटना एकत्र येऊन स्‍थापन केलेली संघटना नसून ती फक्‍त १४ सदस्‍यांनी स्‍थापन केलेली सोसायटी आहे, या मतावर आपण ठाम आहे, असे प्रकाश वेळीप यांनी सांगितले. ‘उटा’चे नोंदणीकरण होताना या आठ संघटनांचा कुठेही उल्‍लेख नाही. मात्र, ‘उटा’चे पूर्वीचे खास सचिव उदय गावकर यांनी ‘उटा संघर्ष’ या पुस्‍तकात आठही संघटनांची नावे देऊन त्‍यांनी संघटना स्‍थापन केली आहे असे लिहून ठेवले आहे त्‍याबद्दल काय? असे विचारले असता, कदाचित गावकर यांना ‘उटा’च्‍या घटनेत, नोंदणीकरणात काय लिहिलेले आहे हे माहीत नसावे, असे वेळीप म्‍हणाले.

भाजपचा राजीनामा देण्‍याइतपत परिस्‍थिती अजूनपर्यंत आलेली नाही. आमच्‍या मागण्‍या भाजपच पूर्ण करेल अशी आम्‍हाला खात्री. त्‍यामुळे सध्‍या आम्‍ही ठरविलेल्‍या रणनीतीप्रमाणे मार्गक्रमण करणार आहोत.

प्रकाश वेळीप, अध्‍यक्ष (उटा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com