G20 New Delhi Summit: युद्धामुळे जगात विश्वासाचा अभाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; ‘जी २०’ परिषदेचे उद्‍घाटन
PM Narendra Modi
PM Narendra ModiTwitter/@ANI
Published on
Updated on

‘जी-२०’ परिषदेचे उद्‍घाटन आज सकाळी साडेदहा वाजता झाले. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह ‘जी-२०’ देशांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी आफ्रिकन महासंघाला जी-२० देशाच्या गटाचा स्थायी सदस्य म्हणून मान्यता देण्यात आली.

PM Narendra Modi
Margao Parking Project: पार्किंग प्रकल्पावरील रेस्टॉरंट वादाच्या भोवऱ्यात

यानंतर जी-२० परिषदेचे अध्यक्ष

असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभिक निवेदन केले. त्यांनी जगाला भेडसावणाऱ्या मुख्य संकटाचे सूतोवाच केले. रशियाने केलेल्या युक्रेनच्या हल्ल्याचा उल्लेख टाळला तरी युद्धामुळे जगात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे त्यांनी जगाच्या नेत्यांचे लक्ष वेधले.

प्राचीन स्तंभाचा उल्लेख

पंतप्रधान मोदी यांनी अडीच हजार वर्षांपूर्वीच्या एका स्तंभाचा उल्लेख केला. ‘‘दिल्लीपासून जवळ असलेल्या एका जुन्या स्तंभावर प्राकृत भाषेत नोंदलेल्या मजकुराचा उल्लेख केला. यात ‘मानवतेचे कल्याण आणि सुख सदैव सुनिश्चित केले जावे,’ अशी नोंद आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताने जगाला हा संदेश दिला आहे. या संदेशाचे स्मरण करून आपण या परिषदेचे उद्‍घाटन करताना मला आनंद होत आहे,’’ असे ते म्हणाले.

PM Narendra Modi
कविता नक्षत्रासारखी असते; तिच्या स्पर्शाने आयुष्य उजळते

जगाला दिशा देणारा काळ

कोरोना काळात जगात एक अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते. युद्धामुळे या अविश्वासात आणखी भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास व सबका प्रयास’ ही चतुःसूत्री आपल्या पथदर्शक ठरू शकते.

‘सबका साथ’चे प्रतीक

जागतिक अर्थव्यवस्थेतील उलथापालथ असो, अन्न व इंधनाचे व्यवस्थापन असो, दहशतवाद व सायबर सुरक्षा आव्हानांवर मात करून नव्या पिढीला एक भक्कम व सुरक्षित जग देण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. भारताचे ‘जी २०’ देशाचे प्रतिनिधित्व हे देशात व देशाबाहेर ‘सबका साथ’चे प्रतीक बनले आहे. कोट्यवधी भारतीय यात सामील झाले आहेत. याच भावनेतून आफ्रिकन महासंघाला ‘जी २०’ गटात स्थायी सदस्यत्व देण्याचा निर्णय घेतल्याचे मोदी यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com