Goa News: शहरातील चिकन विक्री दुकानांची संख्या मोठी आहे. चिकनकडे खवय्यांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे गल्लीबोळात बरीच चिकन विक्रीची दुकाने अलीकडच्या काळात सुरू झाली आहेत. अशातच म्हापसा शहरात दिवसा दीड ते दोन टन चिकनचा कचरा (वेस्ट) तयार होतो.
यावर तोडग्यासाठी पालिकेने नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांच्या नेतृत्वाखाली हा कचरा कुंडई येथे पाठविण्याबाबत हालचाली करण्याचे ठरविले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, म्हापसा पालिकेने या चिकन वेस्टवर तोडगा काढण्यासाठी हा कचरा आता थेट कुंडई येथील ‘बायोटिक’ या वेस्ट सल्युशन प्रा.लि. कंपनीसोबत मिळून शहरातील चिकन वेस्टची विल्हेवाट लावण्याचे योजिले आहे.
त्यानुसार येत्या 13 फेब्रुवारीला म्हापसा पालिका शहरातील या सर्व चिकन सेंटर दुकानांच्या मालकांची संयुक्त बैठक घेणार आहे.
सध्या म्हापसा पालिका बाजारपेठेतील मासळी मार्केटमधील चिकन वेस्ट उचलते. याव्यतिरिक्त इतरत्र चिकन सेंटरची दुकाने आली आहेत. आणि काहीजण हा कचरा पालिकेकडे न देता परस्पर मिळेल तिथे उघड्यावर फेकताहेत.
अशावेळी कचर्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. याची दखल घेत नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी कचरा व्यवस्थापनावर भर देण्याचा प्रयत्नशील आहेत. त्यानुसार, हा कचरा थेट खासगी कंपनीमार्फत विल्हेवाट लावण्याचा विचार चालविला आहे.
हरकत घेतल्यास करणार कारवाई...
या बैठकीत पालिका कार्यक्षेत्रातील सर्व चिकन सेंटरवाल्यांना या उपक्रमाविषयी सांगितले जाईल.
या बायोटिक कंपनीशी करार करून चिकन सेंटरवाल्यांना हा वेस्ट थेट या कंपनीकडे द्यावा लागेल.
जर कुणी तयारी न दाखविल्यास संबंधितांवर पालिकेने कारवाईची तयारी ठेवली आहे.
या बैठकीत चिकन वेस्टच्या प्रति किलो दर निश्चितीपासून इतर विषयांवर चर्चा होईल.
सध्या पालिकेकडे शहरातील एकूण चिकन सेंटरचा अधिकृत आकडा नाही. हा आकडा मिळविण्यासाठी पालिका पर्यवेक्षकांना येत्या बुधवारपर्यंत सर्व्हे करण्यास सांगितले आहे.
चिकन सेंटरमध्ये कोंबड्यांच्या विष्ठेचे प्रमाणही वाढते. तसेच कोंबड्या कापल्यानंतर पिसे, मांस, हाडे अशा प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणावर जमा होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.