गोव्यात आज या ठिकाणी वीजपुरवठा खंडित

ताब्रावाडो डीटीसी आणि सभोवतालच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.
Power outage in Goa today
Power outage in Goa todayDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वीज खात्‍याला सुपर मार्केट डीटीसीवर तातडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने दि. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत मुड्डावाडो, ताब्रावाडो डीटीसी आणि सभोवतालच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

शिवाय 11 केव्ही बोर्डे फिडरवरून 20 रोजी सस्तीवाडा बोर्डे, समृद्धी टॉवर, मोरजकर इमारत, निर्वाण घरटे, आयटीआय, गृहनिर्माण मंडळ आणि सभोवतालच्या भागात वीज खंडित असेल. 11 केव्ही धारबांदोडा फिडरवरून 20 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत माल्लेम, गौडसाई, उडळशे, मार्गेवाडी, शिवडें, तळसई, धारेश्वरी, गवळीवाडा आदी भागांत वीजपुरवठा केला जाणार नाही. तसेच जस्टीन मार्टिन डीटीसीवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने 21 रोजी जस्टीन मार्टिन डीटीसी आणि लॉड्‌र्स कॉन्‍व्‍हेंट स्‍कूल व परिसरात वीज खंडित असेल. संबंधित ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वीज खात्‍यातर्फे करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Murder Case
Goa Cyber Crime
Goa IIT
Goa Social Media Ban
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com