‘सोनसोडो’ ची वीज तोडणार असा वीज खात्याचा इशारा

वीज खात्‍याचा इशारा: मडगाव नगरपालिकेने योग्‍य उपाययोजना करण्‍याचा सल्ला
fire in Sonsodo
fire in SonsodoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मडगाव नगरपालिकेच्या सोनसोडो कचरा यार्डात गेल्‍या शुक्रवारी लागलेल्या आगीच्‍या दुर्घटनेनंतर वीज खात्याने आता कडक भूमिका घेताना तेथे आवश्यक ती उपाययोजना न केल्‍यास वीजपुरवठा तोडण्याचा इशारा दिला आहे. पालिकेने या घटनेला वीज खात्‍याला जबाबदार धरले होते. पण वीज खात्‍याने याबाबत पालिकाच उदासीन असल्‍याचा आरोप केला होता.

fire in Sonsodo
भाटले-पणजी येथील सटी भवानीची आज पालखी

वीज खात्याचे साहाय्यक अभियंता कार्लोस फर्नांडिस यांनी यासंदर्भात पालिकेला एक पत्र पाठविले असून, त्यात त्यांनी 33 केव्ही वीजवाहिनींखालील कचऱ्याच्‍या राशी त्वरित हटविण्याची सूचना केली आहे. तसेच सदर वाहिन्यांच्या जवळपासही अशा प्रकारे कचरा टाकला जाणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे. त्याकडे दुर्लक्ष झाले तर कचरा प्लांटला होणारा वीजपुरवठा तोडणे भाग पडेल, असा इशाराही या पत्राद्वारे देण्‍यात आला असून आपत्कालीन स्थितीत उपयुक्त उपायही त्यांनी सुचविले आहेत.

fire in Sonsodo
कारवार ते मडगांव येथे बाबरे खाडीवर पूल उभारणी सुरू

आग दुर्घटनेला पालिकाच जबाबदार

सोनसोडो येथील 33 केव्ही दाबाच्या वीजवाहिन्या तेथून स्थलांतरित करण्याच्या मडगाव नगरपालिकेच्या मागणीवर बोलताना फर्नांडिस म्हणाले की, त्यासाठी नगरपालिकेला 15 टक्के पर्यवेक्षण शुल्क चुकते करावे लागेल. तसेच परवानाधारक वीज ठेकेदाराला 33 केव्ही भूमिगत केबल टाकण्याचे काम द्यावे लागेल. डिसेंबर 2019 मध्ये खात्याने मडगाव पालिकेला पत्र पाठवून उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांखाली कचरा टाकू नये अशी विनंती केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच पुन्हा ही दुर्घटना घडली असे सांगून त्यांनी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा इन्कार केला. पहिल्‍यांदा कचऱ्याला आग लागली व त्‍यामुळे कंडक्टर वितळून गेला, असा दावाही त्‍यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com