Construction of bridge
Construction of bridgeDainik Gomantak

कारवार ते मडगांव येथे बाबरे खाडीवर पूल उभारणी सुरू

अवजड वाहनांना बंदी: माशे ते चाररस्ता बगलमार्गावर वळवली वाहतूक; प्रवाशांचे हाल
Published on

काणकोण: कारवार ते मडगांव हमरस्त्याच्या बाबरे खाडीवरील जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्यात येत आहे. तर अर्धफोंड येथील तळपण नदीवरील पुलाची दुरूस्ती चालू आहे. मात्र, या कारणांमुळे हा मार्ग प्रवासी बसगाड्या व अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.

कारवार ते मडगाव व परत या मार्गावरील सर्व प्रवासी बस गाड्या माशे ते चाररस्ता मनोहर पर्रीकर बगल मार्गाने वळविण्यात आल्याने माशे ते खालवडे पर्यंतच्या प्रवाशांचे हाल झाले.गेल्या आठवड्यापासून अनिश्‍चित काळासाठी या प्रवासी बसेस या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. बाबरे खाडीवर माशे येथे जुन्या साकवाच्या जागी दोन कमानीच्या पुलाची उभारणी करण्यात येत आहे. तसेच अर्धफोंड येथे तळपण नदीवरील पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे.

Construction of bridge
पेडणे येथे नटवर्य प्रभाकर पणशीकर स्मृती महोत्सव 13 मार्च पासून

बस नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

कदंब महामंडळाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर मिनी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. प्रवासी बसेस बंद असल्याने नोकरदारांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गैरसोय झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज दुचाकीवरून महाविद्यालयात सोडण्याची वेळ पालकांवर आली असल्याचे पैंगीण येथील एक पालक आशुतोष कामत यांनी सांगितले.

Construction of bridge
भाटले-पणजी येथील सटी भवानीची आज पालखी

पैंगीण, श्रीस्थळ भागातील प्रवाशांचे अतोनात हाल

पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे, त्यामुळे प्रवासी गाड्या बगल मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. मात्र, या भागातील प्रवाशांची सोय करण्यात आली नाही. पूर्वी अंतर्गत भागातून खासगी मिनी बसेस प्रवासी वाहतूक करीत होत्या, मात्र कोविड काळापासून त्या बंदच आहेत. त्यामुळे समस्येत आणखी भर पडली आहे. पैगीण पंचायत क्षेत्र, व श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील नियमीत कामधंद्यानिमित्त जाणाऱ्या लोकांना स्वतःचे वाहन चावडीवर ठेवून नंतर बस गाठून पुढचा प्रवास करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com