Viral Video: लाईव्ह सुरू असताना 2 गाड्यांचा टायर पंक्चर, मुंबई - गोवा महामार्गाची भीषण अवस्था दाखवणारा व्हिडिओ

पावसाळ्यात मुंबई- गोवा महामार्गावर खूप खड्डे पडले असून, याचा प्रवाशांना मोठा त्रास होत आहे.
Mumbai Goa Highway Viral Video
Mumbai Goa Highway Viral VideoDainik Gomantak

Mumbai Goa Highway Viral Video: मागील बारा वर्षांपासून मुंबई- गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गावरील रस्त्याची अवस्था आणि त्यावरील खड्डे याची वारंवार चर्चा होत आली आहे. मार्गावरून प्रवास करणारे नागरिक रस्त्याच्या अवस्थेबाबत वारंवार प्रश्न उपस्थित करतात मात्र, प्रश्न जैसे थे असल्याची प्रवासी तक्रार करतात.

पावसाळ्यात मुंबई- गोवा महामार्गावर खूप खड्डे पडले असून, याचा प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. दरम्यान, एक तरूण व्हिडिओ ब्लॉग करत असताना त्याच्या आणि दुसऱ्या आणखी एका प्रवाशाच्या कारचा टायर पंक्चर झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जीवन कदम या तरूणाने मराठी युट्युबर या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. जीवनच्या गाडीचा टायर पंक्चर झाल्याने तो एका ठिकाणी थांबून रस्त्याची दुरावस्था दाखवणारा व्हिडिओ ब्लॉग करत होता, त्याचवेळी मार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या कारचा टायर पंक्चर झाला. जीवनने रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याचे व्हिडिओतून दाखवले आहे.

Mumbai Goa Highway Viral Video
चार हजार कोटींचे कथित विदेशी चलन उल्लंघन; गोव्यातील साळगावकर कुटुंबाची चौकशी आता ED करणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वारंवार मुंबई - गोवा महामार्गाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे अशी टीका मनसेकडून करण्यात आली आहे.

"एक आडवा नि तिडवा खड्डा चंद्रावानी पडलाय गं... मेला कंत्राटदार हसतोय कसा गं... चाकरमानी पडलाय गं ! अनुभवा आणि सहन करा !" असे खोचक ट्विट मनसेने केले आहे.

Mumbai Goa Highway Viral Video
गोव्यात आढळणारे 'जॅक रसेल टेरियर'; राहुल गांधी घेऊन गेलेली श्वान एवढी खास का आहेत?

मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील बारा वर्षापासून रखडले आहे. नितीन गडकरी यांनी देखील या महामार्गाची पाहणी करून पुढील महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत.

नुकतेच, महामार्गावरील खड्ड्यावरून न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढत दंडही ठोठावला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com