गोवा अग्निशमन दलातर्फे पोस्टर स्पर्धा
पणजी: राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त संपूर्ण गोव्यातील अग्निशमन व आपत्कालिन सेवा संचालनालयतर्फे दोन वेगवेगळ्या वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला गोव्यामधून मोठा प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सांतिनेझ - पणजीतील अग्निशमन सेवा दलाच्या मैदानावर गुरुवारी 14 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.
ही स्पर्धा दोन वेगवेगळ्या वयोगटांसाठी आयोजित करण्यात आली होती. ‘शाळा अग्निसुरक्षा’ आणि ‘अग्नि सुरक्षा नियोज’ हे विषय होते. विद्यार्थ्यांनी स्वतःचे रंगीत साहित्य आणि शाळेचे ओळखपत्र घेऊन आले होते त्यांना आयोजकांतर्फे ड्रॉइंग पेपर देण्यात आला. सुमारे 2155 विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला. 7 ते 10 वयोगटात 916 विद्यार्थ्यांनी तर 11 ते 14 वयोगटात 1239 विद्यार्थ्यांनी आपली चित्रकला पेपरवर उतरवली. ही स्पर्धा 16 ठिकाणी घेण्यात आली होती.
अग्निशमन दलाचे संचालक श्री. नितीन रायकर यांनी अग्निसुरक्षा शाळांबाबत जनजागृती करण्याचे महत्त्व पटवून दिले. आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येक शाळेने आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक मजल्यावर अग्निशामक यंत्र, फायर अलार्म आणि इतर अग्निसुरक्षा उपकरणे असणे आवश्यक आहे ज्याचा वापर आग पसरण्यापूर्वी ती रोखण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा प्रकारची स्पर्धा गोव्यातील तरुण विद्यार्थ्यांना जागरुकता आणि शिक्षित करण्यात मदत करू शकते, असे मार्गदर्शन त्यांनीकेले.
दरम्यान, पणजी सायक्लिंग क्लबच्या सहाय्याने गोवा अग्निशमन दलातर्फे येत्या १७ एप्रिल रोजी आग प्रतिबंधक सप्ताहानिमित्त शहरातील सर्वात मोठ्या सायक्लिंग राईड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 10 कि. मी. व 40 कि. मी. अशा दोन वेगवेगळ्या स्पर्ध्यांत घेतली जाणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.