Goa: प्रकल्प सुरू झाल्यानंतर विरोध मावळेल!

केंद्रीय प्रदूषण खात्‍याकडून आवश्‍यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. येत्या दहा दिवसांत प्रात्यक्षिक केल्यानंतर त्‍वरित पंधरा दिवसांत उद्‍घाटन केले जाईल.
पर्यावरण मंत्री मायकल लोबो
पर्यावरण मंत्री मायकल लोबोDainik Gomantak

कुंडई: महत्त्‍वाकांक्षी बायोमेडिकल कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भोमवासीयांनी जोरदार विरोध आहे. प्रकल्पाच्या उद्‍घाटनानंतर भोमवासीयांना प्रात्यक्षिक दाखविल्यानंतर त्यांचा विरोध मावळेल, असा दावा पर्यावरण मंत्री मायकल लोबो (michael lobo)यांनी प्रकल्पस्थळी केला. गुरूवारी त्यांनी अधिकाऱ्यांच्‍या उपस्थितीत या प्रकल्पाची माहिती पत्रकारांना दिली. नागरिक प्रकल्पस्थळी आंदोलन करण्याच्या भीतीने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राज्यातील (State) सर्व दवाखान्यांतील ‘बायोमेडिकल वेस्ट’ची (Biomedical)विल्हेवाट लावून त्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी राज्यातील पहिला प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सरकारने दहा कोटी रुपयांचा खर्च केला आहे. दवाखान्‍यातील कचरा (Trash)रस्त्याच्या कडेला, पाण्यात फेकला जातो. त्यामुळे संसर्गाचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी या प्रकल्पाची निर्मिती केली. दररोज 28 टन बायोमेडिकल कचऱ्याचे निर्मूलन करण्याची योजना आहे. प्रत्येक तासाला 300 किलो कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सोय केल्‍याची माहिती बायोटेकचे संचालक मनिश ग्रेवाल यांनी दिली.

पर्यावरण मंत्री मायकल लोबो
Goa: कुंडई खूनप्रकरणी पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी घेतला आढावा

कडक बंदोबस्त

प्रकल्पाची माहिती देण्यासाठी बायोटेकने पत्रकारांना (reporter)निमंत्रित केले होते. मात्र, यावेळी स्थानिक विरोध करतील, या भीतीने सरकारकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. किमान 15 ते 20 पोलिस कर्मचारी तैनात होते. तब्बल अडीच तास पत्रकार मंत्र्यांची वाट पाहत होते. तरीही ते वेळेत पोहोचले नाहीत, त्यामुळे पणजीतून आलेल्‍या पत्रकारांचा निरस झाला.

राख टाकणार पिसुर्लेत

दवाखान्यातील कचरा, अवयव यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. त्यापासून खताची निर्मिती केली जाणार आहे. तरीही या प्रकल्पातून निघणारा धूर आणि भुकटी (राख) यापासून परिसरातील गावांमध्ये प्रदूषण आणि रोगराई पसरण्याचा धोका असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रकल्पातील राख पिसुर्लेत टाकली जाणार आहे, त्यामुळे तेथूनही विरोधाची शक्यता आहे.

लसीकरण व्यवस्था

‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी डिचोलीत उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातून जनतेला सरकारी योजनांची माहिती मिळवणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर प्रशासकीय अडीअडचणीही अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच आरोग्यविषयक तपासणीही करण्यात येईल, अशी माहिती विश्वास गावकर यांनी दिली.

कुंडई येथे चढणीवर ट्रक कलंडल्याने एकेरी वाहतूक सुरु; वाहतूक कोंडीची शक्यता

विरोध डावलून अवघ्‍या अकरा महिन्‍यांत प्रकल्‍प

या प्रकल्पाला भोमवासीयांचा विरोध आहे. हा विरोध डावलून कंपनीने अवघ्या अकरा महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण केला. याबाबत मंत्री लोबो यांना पत्रकारांनी प्रश्‍‍न विचारल्‍यावर कचरा व्‍यवस्‍थापन प्रकल्पाची सुरवात झाल्यानंतर स्थानिकांना ही प्रक्रिया दाखविणार आहोत. त्यानंतर त्यांना यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे समजेल आणि त्यांचे समर्थन मिळेल,असा दावा त्यांनी केला. प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचा धोका नाही. केंद्रीय प्रदूषण खात्‍याकडून आवश्‍यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. येत्या दहा दिवसांत प्रात्यक्षिक केल्यानंतर त्‍वरित पंधरा दिवसांत उद्‍घाटन केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध खात्यांचे अधिकारी, डॉक्टर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com