Porvorim Shooting Case: पर्वरी गोळीबारप्रकरणी आठवा संशयित मुंबईत जेरबंद; चुनाभट्टीत सापळा रचून गुन्हे शाखेची कारवाई

Goa Crime Branch Porvorim shooting: पोलिसांना मंगळवारी (२९ सप्टेंबर) सायन-ट्रॉम्बे रोड परिसरात कोरी याच्या हालचालींबाबत तांत्रिक व गुप्त माहिती मिळाली होती.
eighth accused arrested in Porvorim shooting case
Porvorim shooting case eighth suspect arrestedDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: पर्वरी येथील ‘हॉटेल निओ मॅजेस्टिक’बाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेने आठव्या फरार संशयिताला मुंबईतून अटक केली. दीनानाथ त्रिलोकी कोरी (३२, रा. चिखलवाडी, सुमन नगर, चेंबूर, मुंबई) याला चुनाभट्टी परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांना मंगळवारी (२९ सप्टेंबर) सायन-ट्रॉम्बे रोड परिसरात कोरी याच्या हालचालींबाबत तांत्रिक व गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक देखरेखीच्या आधारे त्याचा माग काढला.

त्यानंतर चुनाभट्टी परिसरात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, कोरी याच्या चौकशीतून गोळीबाराच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन वाहनांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही वाहने शोधून काढून पंचनामा करून जप्त केली.

eighth accused arrested in Porvorim shooting case
Goa IDC E Auction: गोव्यात 50 भूखंडांचा ई-लिलाव; वेर्णा, लाटंबार्से अन् किटलातील भूखंडांसाठी 'आयडीसी'ची नोटीस जारी

न्यायवैद्यक पथकाच्या उपस्थितीत वाहनांची जप्ती करण्यात आली असून, त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर आणि पोलीस उपअधीक्षक सूरज हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पीआय महेश गडेकर, पीएसआय माधव नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सुनील बेगूर आणि उद्देश शिरोडकर यांच्या पथकाने कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com