Porvorim Police: हाच तो चोरटा! वेरे-म्हापसा मार्केटमध्ये महिलेच्या गळ्यातून हिसकावले होते मंगळसूत्र....

पर्वरी पोलिसांनी जारी केले सीसीटीव्ही फुटेज; कुठे दिसल्यास संपर्क करण्याचे आवाहन
Porvorim police cctv footage of thief in gold chain snatching
Porvorim police cctv footage of thief in gold chain snatchingDainik Gomantak
Published on
Updated on

Porvorim Police News: राज्यात काही ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याचे चेन हिसकावून पळवून नेण्याचे धुम स्टाईल चोरीचे प्रकार घडत असतात. अशाच एका धुम स्टाईल चोरीतील संशयिताची पोलिसांनी ओळख पटवली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून या संशयिताचे फोटोज, व्हिडिओ समोर आले आहेत.

Porvorim police cctv footage of thief in gold chain snatching
South Goa Recruitment: दक्षिण गोव्यातील 147 रिक्त पदांसाठी पुन्हा भरती

पर्वरी पोलिसांनी हेच सीसीटीव्ही फुटेजमधील फोटोज, व्हिडिओज सार्वजनिक करून या चोरट्यासंबंधित माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या चोरट्याने वेरे म्हापसा येथील मार्केटजवळ 20 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून तो पसार झाला होता. त्याचे नाव अद्याप कळालेले नाही.

त्याच्याकडे निळ्या रंगाची अॅक्टिव्हा 6G मॉडेलची दुचाकी आहे. ही गाडी त्याने गुन्ह्यात वापरली आहे.

Porvorim police cctv footage of thief in gold chain snatching
Narendra Modi Net Worth: नरेंद्र मोदींकडे किती संपत्ती आहे? पंतप्रधान म्हणून त्यांना किती पगार मिळतो? जाणून घ्या सविस्तर

या फोटो, व्हिडिओतील आरोपीला पाहा आणि त्याची दुचाकी किंवा तो कुठे आढळून आला तर त्याला पकडण्यासाठी पोलिसांना मदत करा, असे आवाहन पर्वरी पोलिसांनी केले आहे.

राज्यातील नागरीकांना पोलिसांशी त्वरीत संपर्क साधता यावा, यासाठी पोलिसांनी संपर्क क्रमांकही दिले आहेत. 7875756030, 7030949365 किंवा 0832-2417704 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पर्वरी पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com