Goa HSSC Result 2023: विद्यार्थ्यांच्या मार्कलिस्टवरून आडनाव, पालकांची नावे गायब; नाहक मनस्ताप

वास्कोतील सेंट अँड्र्यू विद्यालयाने गुणपत्रिका परत मागवल्या
Goa HSSC Result 2023
Goa HSSC Result 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa HSSC Result 2023: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या वडीलांचे नाव व आडनाव न घातल्याने वास्को येथील सेंट अँड्र्यू विद्यालयातील विद्यार्थ्यांची तसेच पालकांची धावपळ उडाली. दरम्यान, दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांकडून गुणपत्रिका परत मागवल्या आहेत.

Goa HSSC Result 2023
केदारनाथचे दर्शन घेऊन परतणाऱ्या गोव्यातील भाविकांच्या वाहनाला आग

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी जाहीर केला. निकालानंतर मंडळाने गुणपत्रिका विद्यालयात वितरीत केल्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिका विद्यालयातून घेतल्या व पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु केली.

दरम्यान पुढील प्रवेश घेण्यासाठी जेव्हा विद्यार्थ्यांनी अर्ज भरला तेव्हा मंडळाने दिलेल्या गुणपत्रिकेत काही विद्यार्थ्यांचे आडनाव तर काही गुणपत्रिकेत वडीलांचे नाव गायब असल्याचे दृष्टीपथास पडले.

आपल्या विद्यालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांनी प्राचार्याच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यानुसार विद्यालयात सदर गुणपत्रिका विद्यार्थ्यांकडून परत मागवल्या आहेत.

Goa HSSC Result 2023
Goa University: पदवी स्तरावर 75 टक्के गुण असल्यास थेट मिळणार पीएच.डी.ला प्रवेश; गोवा विद्यापीठात अंमलबजावणी

दरम्यान गोवा शालांत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या या चुकीमुळे विद्यार्थ्यांची तसेच पालकांची धावपळ सुरू झाली आहे. विद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका दुरुस्तीसाठी परत मागवल्या असून त्यानूसार विद्यार्थ्यांबरोबर पालकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ती आता लांबणीवर पडली आहे. कारण जोपर्यंत नवीन गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळत नाही तोपर्यत पुढील प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची वाट पाहत रहावे लागेल.

त्यासाठी मंडळाने गुणपत्रिका लवकरात लवकर दुरुस्त करुन विद्यार्थ्यांना सुपूर्द कराव्या अशी मागणी पालक वर्गांकडून होत आहे.

आज वाडे वास्को येथील सेंट अँड्र्यूज कॉलेजमध्ये गुणपत्रिका परत करण्यासाठी सकाळ पासून विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. त्या विद्यार्थ्यांकडून गुणपत्रिका दुरुस्तीसाठी लेखी अर्ज घेण्यात आला. त्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांनी दिलेल्या अर्जासहित गोवा शालांत मंडळाला पाठवणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com